ओबीसी महाएल्गार सभेला संख्या दाखवा-डॉ.शिवाजी राऊत

Ashti

आष्टी तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांचा महाएल्गार सभेच्या बैठकीत उत्स्फूर्त प्रतिसाद
आष्टी/ बीडसत्ता प्रतिनिधी 
ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते ना. छगनराव भुजबळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी राज्यभर दौरा करत आहेत. येत्या 13 जानेवारी रोजी ना. छगनराव भुजबळ साहेबांची ऐतिहासिक सभा बीड शहरामध्ये होत आहे. ही सभा लाखोच्या संख्येने यशस्वी होणार असून या सभेचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे. ओबीसी बांधवांनो हीच वेळ आहे ओबीसी समाजाची संख्या आणि ताकद दाखविण्याची असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत यांनी आष्टी येथे आयोजित ओबीसी समाज बांधवांच्या बैठकी प्रसंगी केले आहे.

यावेळी बोलताना माजी जि. प. अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत पुढे म्हणाले की, ओबीसी आरक्षणावर संकट आले आहे. ज्यांना ओबीसी म्हणून आरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे काही लोक ओबीसी म्हणून आरक्षण द्यावे अशी मागणी करीत आहेत. त्यांची मागणी चुकीची असली तरी सरकारला या मागणीला महत्व न देता ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये यासाठी ना. छगनराव भुजबळ लढा देत आहेत. त्यांच्या या लढाईला हातभार लावण्यासाठी बीड जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांनी एकजुटीने उभे राहणे महत्त्वाचे आहे. यासाठी येत्या 13 जानेवारी रोजी बीड शहरात होत असलेल्या ओबीसी एल्गार महासभेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत यांनी यावेळी केले.याप्रसंगी समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ड. सुभाष राऊत, नामदेवराव राऊत रंगनाथ धोंडे नांदूरचे सरपंच संजय विधाते दौलावडगावचे सरपंच भरत जाधव, डोंगरगणचे सरपंच वाघ, बाकीचे उपसरपंच भाऊ अस्वर, हमाल पंचायतचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अहमद पठाण, आदेश निमोणकर, संजय धोंडे, दीपक सायकड, मुकेश धोंडे, मुकेश सायकड, उमेश धोंडे, अण्णा धोंडे, अक्षय विधाते, अक्षय गदादे, ओम झगडे, रमेश गोरे, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष बाबा वाघुले, कैकाडी समाजाचे अध्यक्ष गणेश जाधव, बाबा ससाने, पप्पू भोरे, अजित मुळे यांच्यासह ओबीसी समाजातील विविध जाती बांधवांसह समता सैनिक आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भुजबळ यांनी केले.