सह्याद्री अर्बन दिनदर्शिका 2024 प्रकाशन 

Beed

सरपंच राजेंद्र राऊत व डॉ.सुनील बोबडे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा 
बीड/ बीडसत्ता प्रतिनिधी 
बीड येथील नावलौकिक असलेली सह्याद्री अर्बनचा आज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला . या वेळी हा दिनदर्शिकेचे प्रकाशन नाळवंडीचे सरपंच राजेंद्र राऊत व डॉ.सुनील बोबडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी गावातील तसेच शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

सह्याद्री अर्बनचे चेअरमन सखाराम मोहन राऊत यांच्या सह्याद्री अर्बन दिनदर्शिकाचा प्रकाशन सोहळा पार पडला . या कार्यक्रमासाठी दोन प्रमुख पाहुण्याची उपस्थिती लाभलेली होती . यामध्ये नाळवंडीचे नवनिर्वाचीत सरपंच राजेंद्र राऊत व बीड शहरातील नामाकित ह्रदयविकार स्पेशलिस्ट डॉ.सुनील बोबडे या मानवरांच्या हस्ते हा प्रकाशन करण्यात आले.
नाळवंडी येथील रहिवासी असलेले चेअरमन सखाराम राऊत यांच्या गावातील जेष्ठ मंडळींची व तरूणांनी देखील सह्याद्री अर्बन दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रमाला अवजून उपस्थिती लावली होती.गावातील तरूणांनी ऐवढे नाव लौकिक केल्याचे पाहून जेष्ठांनी चेअरमन सखाराम राऊत यांना आर्शिवाद दिले व कौतुकही केले. यावेळी या प्रकाशनास उपस्थित राहिलेले महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक,अध्यक्ष अ‍ॅड. सतीश शिंदे , सरपंच धनेश्‍वेर खेत्रे ,सोसायटी चेअरमन गणेश राऊत, संतोष मेहेत्रे ,सुभाष क्षीसागर ,घोडके ,डॉ.रमेश शिंदे ,महादेव खांडे सह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती.