नमो चषक भव्य क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये   कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवावा-खा.डॉ.मुंडे

Beed

बीड/ बीडसत्ता प्रतिनिधी 
बीड जिल्ह्यामध्ये भव्य नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या नमो चषक क्रीडा स्पर्धामध्ये  15 पेक्षा अधिक खेळांचा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. स्पर्धेचा उपयोग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील युवकांना होणार असून, जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा. क्रीडा प्रेमींनी राज्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव लौकिक करावे. बीड जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा असून, अन्य क्षेत्रामध्ये आपले नाव कोरलेले आहे. नमो चषक स्पर्धा हि ग्रामीण व शहरी भागातील क्रीडा क्षेत्रात कामगिरी करण्यार्‍या युवकांसाठी दिशा देणारी ठरणार आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील, गावातील खेळाडूंना सहभागी करून घेण्यासाठी ऑनलाई नावनोंदणी करून प्रोत्साहित करावे. या स्पर्धा बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभामध्ये होणार असून, नियोजन पूर्ण झालेले आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडून सहभाग नोंदवावा असे  मत खा. प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केले. 
 भारतीय जनता पार्टी संघर्षयोद्धा भाजपा कार्यालयामध्ये कार्यक्रम पूर्व तयारी निमित्ताने नियोजन बैठक जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यावेळी केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिताताई मुंदडा, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजलगाव विधानसभा निवडणूक प्रमुख मोहनराव जगताप, सर्जेराव तांदळे, नमो चषक बीड जिल्हा प्रभारी सुरेश घुमरे हे उपस्थित होते.
नमो चषक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजपा प्रदेश कडून विधानसभा निहाय पुढील प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. परळी - मा.आ. पंकजाताई मुंडे,  माजलगाव व आष्टी - खा. डॉ. प्रितमताई मुंडे, गेवराई -आ. लक्ष्मण पवार, बीड -आ. सुरेश धस, केज-आ.नमिताताई मुंदडा, या प्रभारींच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न होतील.
नमो चषक भव्य क्रीडा स्पर्धेत तब्बल 10 खेळांचे आणि 7 प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. विजेत्या संघाला भरघोस बक्षीस देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील विविध खेळांचे खेळाडू, संघनायक, व क्रीडा रसिकांनी हीींिीं://परोलहरीहरज्ञ.ळप/ या लिंक वर क्लिक करून आपली आणि आपल्या संघाची नाव नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन खा. प्रितमताई यांनी केले आहे.
या बैठकीस जिल्हा पदाधिकारी - प्रा. देविदास नागरगोजे, नवनाथ शिराळे, सलीम जहागीर, चंद्रकांत फड, पीटी चव्हाण, दादासाहेब गिरी, डॉ. अभय वनवे, शंकर देशमुख, जेडी शहा, अजय धोंडे, विक्रांत हजारी, जगदीश गुरखुदे, दादासाहेब गिरी,भूषन पवार,  अनिल चांदणे, शरद झोडगे, राजू शहाणे, विस्तारक - बाबासाहेब आगे, दयावान मुंडे, शांतीनाथ डोरले, हरीश खाडे, राहुल जोगदंड, ईश्‍वर पवार, रमेश शेंडगे, महिला मोर्चा - जयश्रीताई मुंडे, संध्याताई राजपूत, संगीताताई धसे, प्रीत कुकडेजा मंडळ अध्यक्ष - भगवान केदार, पोपटराव शेंडगे, विलास येवले, प्रकाश सुरवसे, सुरेश उगलमुगले, बाळासाहेब चोले, विलास बामणे, अमोल वडतिले, बद्रीनाथ जटाळ, राणा डोईफोडे, जालिंदर सानप, मच्छिंद्र सानप, रामदास बडे, शिवाजी पवार, प्रकाश खेडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.