गंगाधर काळकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त जिव्हाळा बेघर आश्रमात अनाथांना दिले जेवण

बीड/ बीडसत्ता प्रतिनिधी
राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा संपादक गंगाधर काळकुटे पाटील यांचा 5 जानेवारी रोजी वाढदिवस होता. मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे व मराठा आरक्षणासाठी तरुणांनी केलेल्या आत्महत्या यामुळे या वर्षीचा वाढदिवस कुठलाही सत्कार किंवा हारतुरे न घेता वाढदिवसा दिवशीच मराठा आरक्षणासाठी एक दिवशी लाक्षणिक उपोषण करून त्यांनी वाढदिवस साजरा केला.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनाही आव्हान केले की सामाजिक उपक्रम घेऊनच वाढदिवस साजरा करा. त्याचाच एक भाग म्हणून काल मातोश्री कौशल्य सेवाभावी संस्थेच्या वतीने गंगाधर काळकुटे पाटील यांचा वाढदिवस जिव्हाळा बेघर अनाथ आश्रमातील वृद्धांना एक वेळेचे जेवण देऊन वाढदिवस साजरा केला. यावेळी मातोश्री कौशल्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुरेश माने,कार्यकारी संपादक दिपक काळकुटे, व्यवस्थापक प्रवीण वडमारे व जिव्हाळा बेघर अनाथ आश्रमाचे व्यवस्थापक राजू वंजारे, संचालक अभिजीत वैद्य, महिला कार्यवाहक छाया सरोदे, काळजीवाहक यश वंजारे, लक्ष्मण माने, यांच्यासह आश्रमातील सर्व स्टाफ उपस्थित होता. यावेळी व्यवस्थापक राजु वंजारे यांनी प्रस्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून दिपक काळकुटे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की समाजातील सर्व घटकांनी आपला कुठल्याही कार्यक्रम असो वा वाढदिवस असो आपण सर्वांनी जिव्हाळा बेगर अनाथ आश्रमात साजरा करावा. त्यानंतर मातोश्री सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुरेश माने यांनीही आपले विचार व्यक्त केले व आश्रमातील सर्व वृद्ध अनाथांनी गंगाधर काळकुटे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली .

