माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून ग्रामीण रूग्णालयाच्या बांधकामाची पाहणी

Shirur

9 कोटी रुपयाचे बांधकाम लवकरच पुर्ण होणार 
रायमोहा/बीडसत्ता प्रतिनिधी
माजीमंत्री माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ग्रामिण रुग्णालय रायमोह ता .शिरुर (कासार) या इमारतच्या चालु आसलेल्या बांधकामास रविवार दि 7 रोजी भेट दिली देऊन गुत्तेदार आणि  सार्वजनिक बांधकाम विभागास काम दर्जेदार आणि लवकर काम पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत

ग्रामिण रुग्णालय रायमोह इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभिलेखावरील नोंदी नुसार सन 1977-78 च्या कालावधीत बांधलेले आसुन बांधकामास आज 45 वर्ष पुर्ण होत आहेत.सदर इमारत तांत्रिक दृष्टया रुग्णालय वापरासाठी अयोग्य असल्या बाबत सा.बां बीड विभाग -2 यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना कळवले होते,इमारतीची जिर्णावस्था तालुक्यातील लोकांची मागणी तसेच वाढत्या लोकसंख्येनुसार नविन इमारतीची अवश्यकता या बाबींचा विचार लक्षात घेवुन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या सुचनेवरुन सा.बां बीड विभाग -2 यांनी सदरील रुग्णालयाचा टाईप प्लान नुसार अंदाजपत्रक तयार करुन पुढील अवश्यक त्या कार्यवाही साठी  कार्यकारी अभियंता , अधिक्षक अभियंता मुख्याभियंता,जिल्हा शल्य चिकित्सक पुढे मा .संचालक आरोग्यसेवा रुग्णालये (राज्यस्तर ) यांच्या कडुन मंजुरी मिळणे साठी पाठवला होता.माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिनांक 6 फेब्रुवारी 2019 रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे बीड येथे अमृत भुयारी गटार योजना व नगरोत्थान अंतर्गत सिमेंट रोड या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी आले आसता ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाच्या व अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळावी यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली होती.त्या अनुषंगाने 29 ऑगस्ट 2019 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी ग्रामीण रुग्णालय रायमोह च्या बांधकामाच्या अंदाजपत्रकास शासन निर्णयाद्वारे1380 लक्ष रु. प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती.30 खाटांच्या या ईमारतीसाठी प्रत्यक्षात बांधकाम करण्यासाठी 9 कोटी 6 लाख 36 हजार 243 रूपयांचा निधी मंजूर करून आणला होता.या कामात पार्किंग व्यवस्था, गार्डन आणि सोलार प्रणालीचे सुद्धा प्रयोजन आहे. त्यामुळे जयदत्तअण्णा सत्तेत असो किंवा नसो विकास हीच आमची जात आणि विकास हाच आमचा धर्म असे मानून चालणार्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी रायमोह येथे दिलेला शब्द पूर्ण केला असल्यामुळे रायमोह पंचक्रोशी ग्रामस्थांनी आणि शिरुर तालुक्यातील जनतेने माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे मनापासून आभार मानले आहेत.लवकरच या आरोग्य सुविधा रुग्णांना प्राप्त होणाऱ आसुन यासाठी शिरुर तालुक्यातील सर्व जनतेकडुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.दि 7 रोजी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रायमोहा येथील आपल्या संपर्क कार्यालयात भेट दिली असता आसपासच्या शेकडो ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या आणि रुग्णालयाचे होत असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले यावेळी
माजी सभापती सुधाकर मिसाळ,अ‍ॅड. जब्बार पठाण , वसंतराव सानप माजी सभापती सतीश काटे सभापती उषाताई सरोदे , माजी प सदस्य सुभाष क्षीरसागर , माजी सभापती बाबुराव केदार, सुलेमान पठाण संजय सानप आयुब तांबोळी सुधाकर जाधव गुलजार पठाण पांडुरंग तागड सरपंच, माजी सरपंच गोरख तागड उपसरपंच प्रभाकर सानप गजानन बँकेचे बँक संचालक शरद ढाकणे भारत बहिर सर मित्र मंडळ दत्ता शिंदे मच्छिंद्र चव्हाण सरपंच, भागवत गायकवाड, विजय जायभाय गहीनाथ जिजा पाखरे पाडळी सरपंच,आदी उपस्थित होते