सावित्रीमाई मुळेच आज स्त्री सक्षम होताना दिसत आहे - डॉ. नैयना पाटील

संकल्प विद्या मंदिर येथे सावित्रीमाई यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्सवात साजरी..!
देवळा बु /बीडसत्ता प्रतिनिधी
3 जानेवारी म्हटलं की डोळ्यासमोर येते सावित्रीबाई यांची जयंती त्यानिमित्त आज संकल्प विद्या मंदिर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्सवात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बडे आर.एस.होत्या तर प्रमुखात अतिथी म्हणून डॉ.पाटील सर व डॉ.पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आल. यावेळी चिमुकल्यांनी आपल्या भाषेमध्ये सावित्रीबाईच्या कार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी केलेले विविध वेशभूषा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.श्रीमती बडे आर.एस. यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई यांच्या विषयी प्रस्ताविकासह, मार्गदर्शन करून डॉ.पाटील सर यांनी यांनी विद्यार्थ्यांना समजेल या भाषेमध्ये आपण बालिका दिन का साजरा करतो? बालिका दिन म्हणजे काय?सावित्रीबाई चे कार्य काय? अशा विविध मुद्द्यांना हात घालून अनमोल मार्गदर्शन केले तर डॉ.पाटील मॅडम यांनी सावित्रीमाई मुळेच आज महिला सक्षम आहे असे उद्गार काढून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नायक पी.एच. यांनी केले तर आभार श्रीमती घाडगे मॅडम यांनी म्हणले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग , विद्यार्थी ,शिक्षक यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

