उसतोड कामगार्यांच्या मंजुरीत 34 टक्के दरवाढ

शरद पवार-पंकजा मुंडे यांच्या भेटीतून राज्यातील महत्वाच्या प्रश्नावर तोडगा निघाला
पुणे /प्रतिनिधी
पुण्या येथे शरद पवार आणि पंकजा मुंडेंची भेट झाली. पवार-मुंडेंच्या मध्यस्थीतून ऊसतोड कामगारांच्या मजुरीबाबात तोडगा निघाला. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 92 रुपयांची वाढ करण्यात आली.
राज्यातील ऊसतोड कामगार मजुरीत 92 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर तोडगा निघाला. ऊसतोड कामगारांना सध्या 274 रुपये प्रति टन मजुरी दिली जाते. त्यात 34 टक्के दरवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना चालू हंगामापासून 366 रुपये प्रति टन मजुरी मिळणार आहे.
राज्यातील ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऊसतोड कामगारांना मजुरीमध्ये 92 रुपयांची वाढ झाली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीमुळे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे.
पुण्यातील साखर संकुल मध्ये साखर कामगार आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. अपेक्षित दरवाढ न दिल्यास कोयताबंद आंदोलनाचा इशारा ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी दिला होता. राज्य साखर महासंघाचे पी आर पाटील, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर महासंघाचे संचालक जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आदी बैठकीसाठी उपस्थित होते.

