गेवराईत गर्भलिंग निदान करणार्‍या टोळीवर छापा

Beed

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बडे यांच्या टिमचे कौतुक
गेवराई /बीडसत्ता प्रतिनिधी
गेवराई शहरातील संजय नगर भागात एका किरायच्या रूम भाड्याने घेऊन त्या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात केला जात असल्याची माहिती बीड जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे व त्यांच्या टिमने सकाळी आठच्या सुमारास याठिकाणी छापा मारला तसेच या कारवाईत गर्भपात करणारी सामग्री व विविध मशीन सह मालकाला व एक महिला हिला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरात संजय नगर परिसरात अवैधरित्या गर्भपात केला जात असल्याची तक्रार बीड जिल्हा वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडे प्राप्त झाली त्यानुसार सदर ठिकाणी खरोखर असा काही प्रकार सुरू आहे का? याबाबत बीड जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी  डमी रूग्ण महिला तयार करून सदर फोन करूण याची पुष्टी केली तसेच या प्रकरणी बीड स्थानिक गुन्हे शाखा व वैद्यकीय पथक यांनी सदर ठिकाणी (दि 4 जानेवारी रोजी ) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला व याठिकाणी एक महिला व घरमालक त्यांना मदत करणारे दोन लोक असे एकूण चारजण ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे तसेच याठिकाणाहून सोनाग्राफी मशीन व गर्भपात करणारी सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी पुढील कारवाई सुरु असुन आरोपी महिला हि नर्स असुन तिच्यावर काही महिण्यापुर्वी असा गुन्ह्यासंदर्भात कारवाई करण्यात आली होती जामिनवर सुटल्यानंतर तिने हा व्यावसाय परत सुरू केला असल्याचे समजले तसेच एक महिला व तिच्या साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कारवाई बीड जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, सपोनी सुरेखा धस विधी अधीक्षक मोहम्मद नोमानी, डॉ. रांदड, डॉ. राजेश शिंदे सह अन्यजन र्यवाईत सहभागी होते.