‘धाकटी पंढरी’च्या विकासासाठी उर्वरित निधी देऊन टाकतो-गिरीश महाजन यांचे आश्वासन

विश्वस्तांसोबत केली चर्चा
बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
धाकटी पंढरी श्री.क्षेत्र नगद नारायण गड येथील विकास कामांसाठी 25 कोटींचा आरखडा पुर्वीच मंजूर करण्यात आला असून यातील दोन कोटी रूपये प्राप्त झालेले आहेत. उर्वरित निधी देण्यात यावा, आशा आशयाचे निवेदन विश्वस्तांनी मंगळवारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविताच महाजन यांनी ’गडासाठीचा उर्वरित निधी देऊन टाकतो’,असे आश्वासन दिले.
श्री.क्षेत्र नगद नारायण गडाचे विश्वस्त अनिल जगताप, बळीराम गवते, बी.बी.जाधव, गोवर्धन काशीद, अशोक सुखवसे यांनी मंगळवारी मंत्रालय, मुंबईत मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. धाकटी पंढरी म्हणून पाहिले जात असलेले श्री.क्षेत्र नगद नारायण गडाच्या विकासाठी सन 2018 मध्ये 25 कोटी रूपयांच्या विकास आरखड्यास मंजूरी दिलेली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी ही मंजूरी दिली होती, यासाठी स्व.विनायक मेटे, तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केले होते. दरम्यान, यातील दोन कोटी रूपये आजवर प्राप्त झाले असून यातून गडावर बांधकाम झालेले आहे. उर्वरित निधी मिळावा, यासाठी कोरोना काळापासून गडाचे महंत ह.भ.प शिवाजी महाराज, महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब,माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब,शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक विश्वस्त मंडळ प्रयत्न करत आहे. आता हा निधी मिळावा, यासाठी दि.2 जानेवारी रोजी श्री क्षेत्र नारायण गड संस्थानचे विश्वस्त अनिल जगताप, बळीराम गवते, बी.बी.जाधव, गोवर्धन काशिद, अशोक सुखवसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. महाजन यांनी श्री.क्षेत्र नगद नारायण गडाचे निवेदन पाहताच, या गडाचे आपण खुप वर्षांपासून नाव एैकून आहोत. संपुर्ण महाराष्ट्रातून याठिकाणी भाविक येतात. त्यामुळे गडासाठी विकास आराखड्यातील उर्वरित निधी तातडीने देऊन टाकतो, असा शब्द यावेळी दिला.शिवाय संबधित अधिकार्यांशी संपर्क करून पुढील कार्यवाही आजच सुरू करा, असेही आदेश दिले.

