पोस्ट ऑफीसमध्ये बनावट खाते उघडून 87 लाखाचा  भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई करा- मराठा महासंघ

Beed

बीड /बीडसत्ता प्रतिनिधी
 बीड शहरातील खडकपूरा येथे असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये 108 लोकांचे बनावट खाते उघडून जवळपास 87 लाख रुपयांचा भ्रष्टचार करणार्या पोस्ट ऑफिसमधील कर्मचार्या विरुध्द कारावाई करण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे मोहन बेगवाडे हे खडकपूरा पोस्ट ऑफिस कार्यालया समोर उपोषणास बसले आहेत.

बीड शहरातील  खडकपूरा येथील जुने पोस्ट ऑफिसमध्ये 108 लोकांचे बोगस खाते उघडून जवळपास 87 लाख रुपयांचा भ्रष्टचार केला गेला असून बोगस खाते उघडणार्या कर्मचार्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब साळुंके, युवक जिल्हाध्यक्ष दिपक गिराम व युवक जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मस्के यांनी बीडचे पोस्ट ऑफिस अधिक्षकाना दिले आहे. तर मराठा महासंघाच्यावतीने मोहन बेगवाडे यांनी मंगळवार दि.2 जानेवारी पासून खडकपूरा पोस्ट ऑफिस  कार्यालया समोर उपोषण सुरु केले आहे. 
बोगस खाते उघडणार्या कर्मचार्यांच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई करण्यात आली नाही तर मराठा महासंघ यापुढील आंदोलन तिव्र स्वरुपात करेल असेही निवेदनात म्हटले आहे.