मंडळ अधिकारी कार्यालयाला हार घालून शेकापने केले ठिय्या आंदोलन

तर..मंडळ अधिकारी कार्यालयाच्या आवारात गांजा
लावण्यासाठी परवानगी द्या-भाई अॅड.नारायण गोले पाटील
माजलगाव/बीडसत्ता प्रतिनिधी
माजलगाव तालुक्यातील गंगामसला मंडळाचे मंडळाधिकारी सानप हे गेल्या अनेक वर्षापासून सज्जा वर राहत नसून शासनाने लाखो रुपये खर्चून बांधकाम केलेल्या मंडळ अधिकारी कार्यालयाची प्रचंड दुरावस्था झाली असून मंडळ अधिकारी कार्यालयाच्या आसपास प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामूळे गंगामसला येथील गावकर्यांना मंडळ अधिकारी कार्यालयाच्या अवतीभवती निर्माण झालेल्या घाणीमुळे रोगराईला सामोरे जावे लागत असून गेल्या अनेक वर्षापासून मंडळ अधिकारी कार्यालयावर मंडळ अधिकारी सानप हे न आल्यामुळे परिसरातील शेतकर्यांची अनेक कामे खोळंबली असून संबंधित मंडळाधिकारी यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते अरे रावीची भाषा करतात याबाबत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा निवेदने देऊन संबंधित अधिकारी यांच्याबाबत तक्रार करूनही कुठलीही कार्यवाही होत नसल्याने एक जानेवारी रोजीभाई अॅड.नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गंगामसला महसूल मंडळाच्या मंडळाधिकारी कार्यालयाला पुष्पहार घालून दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले येथे आठ दिवसात मंडळ अधिकारी सानप हे सज्जावर वास्तव्याला न थांबल्यास मंडळ अधिकारी कार्यालयाच्या आवारात गांजा लागवडीची परवानगी जिल्हाधिकारी सह आयुक्त कार्यालयाकडे मागणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई अॅड.नारायण गोले पाटील यांच्या सह भाई राहुल सोळंके, भाई विष्णू शेळके भाई सुशील हांडे, भाई मुंजा पांचाळ, आदींनी केली आहे.

