मराठायोद्धा मनोज जरांगे यांची आकाश मोटर्सला सदिच्छा भेट

मराठा महासंघातर्फे मनोज जरांगे यांचा सत्कार

बीड /बीडसत्ता प्रतिनिधी
 मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सोमवारी बीड शहर दौर्यावर असताना मनोज जरांगे यांनी शहरातील प्रसिध्द कृषी उपकरणे विक्रते व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब सांळुके यांच्या आकाश मोटर्स व कृष्णा पॉवर टिलर दुकानाला भेट दिली. या वेळी त्यांचा मराठा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 
या बाबत अधिक माहिती अशी की,बीड शहरातील प्रसिध्द असलेले कृषी उपकरणे विक्रता आकाश मोटर्स व कृष्णा पॉवर टिलर लिमिट दुकानाला आज दि.1 जानेवारी रोजी मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. या वेळी त्यांचा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब सांळुके व महासंघाच्या सर्व पदाधिकार्यांनी सत्कार केला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय युवा प्रतिनिधी किशोर गिराम पाटिल, मराठवाडा उपाध्यक्ष  नारायणराव थोरात, बीड जिल्हा कार्याध्यक्ष आदिनाथ पिंगळे पाटील, बीड जिल्हा सरचिटणीस भागवत बादाडे, बीड जिल्हा संघटक विलास सातपुते, बीड तालुका अध्यक्ष प्रकाश तात्या शिंदे, बीड शहर अध्यक्ष दत्ता शेळके पाटील, युवा उद्योजगक व सामाज सेवक संभाजी पवार, युवा उद्योजगक प्रसिद्ध सामाज नेते गोरख भाऊ शिंदे, तसेच मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.