समाजपयोगी उपक्रम काळाची गरज : डॉ हुबेकर


नेकनूरचे पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबीर
नेकनूर - दि ३१ वार्ताहार
वाढदिवस म्हटलं की पैशाचा अपव्यय असेच चित्र सध्यातरी दिसून येत आहे . अशा काळात नेत्र तपासणी , शस्त्रक्रिया यासारखे समाजपयोगी उपक्रम काळाची गरज बनली आहे याचा गोरगरिबांना लाभ होतो . त्यासाठी आणखीन अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे , असे मत नेकनूर च्या स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अशोक हुबेकर यांनी व्यक्त केले . पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेकनूर ( ता . बीड ) येथील शासकीय रुग्णालयात आयोजित नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी ( दि .३१) उद्घाटन झाले . याप्रसंगी डॉ अशोक हुबेकर हे बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ हुबेकर हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून मा जी प सदस्य भारत काळे सरपंच सुंदर लांडगे, उपसरपंच सचिन शिंदे, राजा भैय्या, डॉ गणेश ढवळे ग्राप सदस्य चक्रधर शिंदे, सतिश मुळे, फुलचंद काळे,पत्रकार तुळजिराम शिंदे, मनोज गव्हाणे, अमजद पठाण, सुरेश रोकडे, रामनाथ घोडके महारुद्र वाणी , बिभीषण नन्नवरे, दत्ता वायभट, संतोष शिंदे, हे उपस्थित होते . यावेळी भारत काळे म्हणाले की नेकनूरच्या रुग्णालयात रक्तदान , सर्वरोग निदान शिबिर , स्त्रियांच्या आजारावरील शिबिर अशी शिबिरे यापूर्वी आयोजित करण्यात आली होते . परंतु , नेत्र तपासणीसारखं शिबिर गेल्या चार पाच वर्षापासून पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवून सर्वसामान्य रुग्णावर उपचार करून वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्याचे कार्य आयोजित करण्यात येत असल्याने अनेकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अशा प्रकारचे आदर्श उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. यावेळी डॉ मुख्तार सर , डॉ खाकरे सर, डॉ विलास हजारे , बबन सुरवसे,आदिल भाई , प्रशांत भोसले , दत्ता आवारे , राजू शिंदे, हनुमान शिंदे, वैभव शिंदे आदींची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तुळजीराम शिंदे सर यांनी केले . तर पत्रकार अशोक शिंदे यांनी आभार मानले . यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तीनशे रुग्णांची केली तपासणी २३ रूग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया
शिबिरात तीनशे हून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून २३ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहेत . नेत्र तपासणी शिबिरात डॉ . गोपाळघरे मॅडम यांच्यासह टीमचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचेही पत्रकार अशोक शिंदे मित्र परिवाराने आभार मानले आहेत .
नेत्र तपासणी शिबीर हा आदर्श उपक्रम : भारत काळे
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता पत्रकार अशोक शिंदे यांच्या मित्र परिवाराने नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेसारखा आदर्श उपक्रम राबवत उपचाराच्या माध्यमातून वाढदिवसाचा उत्सव साजरा केला असल्याचे मत या वेळी भारत काळे यांनी सांगून या उपक्रमाबद्दल पत्रकार अशोक शिंदे मित्र परिवाराचे कौतूक केले .

