प्राणायामामुळे शरिरातील अनेक रोगांवर नियंत्रण  मिळविणे शक्य-योगप्रशिक्षक डॉ.राजेंद्र सारडा  

Beed

बीड, दि.31डिसेंबर 
 शामसुंदर रत्नपारखी
प्राणायाम व योग साधनेतून मानवाला अनेक रोगांवर नियंत्रण मिळविणे सहज शक्य असून कोणत्याही गंभीर परिस्थितीमध्ये घाबरुन न जाता प्राणायाम केल्यास योगसाधनेतून अनेक व्याधीतून रोगमुक्त होता येते. मधुमेह, उच्चरक्तदाब व इतर आजारांवरही प्राणायाम व आसने हा उत्तम पर्याय आहे यामुळे मनुष्य निरोगी व आनंदी राहण्यास मदत मिळते असे प्रतिपादन योगशिक्षक व आयुर्वेद तज्ञ डॉ.राजेंद्र सारांडानी केले.
बीड शहरातील जिल्हा रुग्णाालयात शनिवार दि.30 डिसेंबरला राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत मोफत आयुष निदान व उपचार शिबीराचे आयोजन बीड जिल्हा आयुष विभागाच्या वतीने होमिओपॅथी, आयुर्वेद व युनानी पध्दतीने रुग्णांची चिकित्सा आणि उपचार मोफत शिबीराचे  आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात सकाळी 7 ते 8 या वेळेत योग शिबीराचे आयोजन करण्यात आलेे. यावेळी योग तज्ञ व आयुर्वेद डॉक्टर राजेंद्र सारडांनी उपस्थितांना योग, प्राणायाम आणि आसनाची विस्तृत माहिती दिली व त्याची कृतीही करुन दाखवली. यावेळी जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ,जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे  यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.पुरुषोत्तम पिंगळे, सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी आनंद कुलकर्णी, रुग्णालयातील परिचारीका, तसेच ज्ञानधन गुरुकुलचे माधव काळकुटे व त्यांच्या शाळेतील विद्यार्थी, तसेच योगप्रशिक्षका अविद्या तेलुरे, योगप्रशिक्षक अ‍ॅड.आनंदकुमार लिंबकर आणि साप्ताहिक वृत्तपर्वचे संपादक डॉ.शामसुंदर रत्नपारखी उपस्थित होते.
यावेळी योगसाधना सुरु होण्यापूर्वी सर्व उपस्थितांच्याकडून साप्ताहिक वृत्तपर्वने प्रसिध्द केलेल्या स्वास्थ्यपर्व या आरोग्य दिवाळी अंकाचे विमोचन करण्यात आले.
योग शिबीराच्या सुरुवातीला डॉ.राजेंद्र सारडांनी योगाची माहिती देताना सांगितले की आहार-विहार हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग असून तो उत्तम ठेवल्यास निरोगी जीवन जगता येते. तसेच योगसाधना नियमितपणे केली तर अनेक व्याधीपासून मुक्तता मिळते व प्रसन्न इंद्रियने राहतात.
ते म्हणाले की योगसाधनेत सर्वांत महत्वाचे म्हणजे  ध्यान-धारणा ही क्रिया असून ज्याचे यावर नियंत्रण असते त्याला मनावर नियंत्रण मिळविता येते. आजच्या युगात मधुमेह हा सर्वसामान्य लोकांना होणारा आजार असून यावर बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहे परंतु मधुमह समूळ नष्ट होत नाही, तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगसाधना व प्राणायाम महत्वाचे आहे.
यावेळी उपस्थितांना प्रशिक्षण देण्यासाठी राजेंद्र साराडांनी विविध आसने व प्राणायामही करुन दाखविला. यामुळे उपस्थितांना  योगसाधनेचे महत्व काळाले व त्याचे प्रशिक्षणही मिळाले.