छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये भारतीय राज्यघटनेच्या  अमृतमहोत्सवी  वर्षानिमित्त परिसवांदाचे आयोजन

Beed

बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये भारतीय राज्यसंघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त परिसवांदाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील इतिहास विभागमार्फत मराठवाडा इतिहास परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 12 व 13 जानेवारी, 2024 रोजी छत्रपती शिवाजी कॉलेजच्या बॅरिस्टर पी. जी. पाटील सभागृहामध्ये (हॉल नं.14) आयोजित करण्यात आलेले आहे. या दोन दिवसांच्या अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडातील इतिहास विषयाशी संबंधित संशोधनपर शोधनिबंधांचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच या अधिवेशनात दि.12 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परिसवांदाचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिसवांदाचा विषय भारतीय राज्यघटना : काल, आज आणि उद्या असा आहे. या परिसवांदास साधनव्यक्ती म्हणून श्री. शिवाजी राऊत,जेष्ठ विचारवंत सातारा, कॉम्रेड विजय मांडके, जेष्ठ पत्रकार व डॉ. भारतभूषण माळी हे असणार आहेत. तर परिसवांदाच्या अध्यक्ष स्थानी श्री किशोर बेडकीहाळ, जेष्ठ विचारवंत सातारा हे असतील. तरी या परिसवांदास जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी केले आहे.