नगरसेवक विष्णू वाघमारे यांच्या पाठपुराव्यामुळे लाभर्थ्यांना मिळवून दिले मंजुरी पत्र

Beed

बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने वृद्ध पुरूष/महिला,विधवा अश्या अनेकांना संजय निराधार,श्रावणबाळ सेवा योजना अशा अनेक योजना अंमलात आहेत. परंतु अनेक वृद्धांना वयामानाने कागदांची पुरतता करता येत नाही.म्हणून या योजनांपासून वंचित रहावे लागते.

बीड तहसील कार्यालय यांच्याकडून अर्ज मागावले जातात. या समितीची बैठक दि.20/11/2023 रोजी संपन्न झाली होती .या बैठकीच्या अनुशगाने माजी जेष्ठ नगरसेवक विष्णु (भैय्या) शामराव वाघमारे यांनी प्रभाग क्रः- 2  व बीड शहरातील निराधार व्यक्तींना या योजनेचे लाभ मिळुन देण्यासाठी प्रयत्न केले सदरील व्यक्तीला त्यांचा फायदाही झाला. तसेच योजने अंतर्गत ज्या लाभार्थींनीचे नाव त्रुटी मध्ये नाव आले असेल तर त्या लाभार्थींनी आपल्यानावापुढे त्रुटीचे शेरा असेल तर त्रुटी पुर्तता करण्यासाठी काही अडचण येत असेल माजी नगरसेवक विष्णू वाघमारे यांच्याशी संपर्क करावा आपल्या अडचणी सोडवून आपल्याला या योजना लाभ मिळवून देतील असे आवाहन केले आहे.