नगरसेवक शेख एकबाल (बॉस) यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड


बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर आणि डॉ. सारिका क्षीरसागर व राष्ट्रवादी नेते बळीराम गवते (आप्पा) यांच्या उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या वेळी नगरसेवक शेख एकबाल (बॉस) यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर सुशांत राऊत यांची सोशल मिडीया सेल जिल्हाध्यक्षपदी निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी नगरसेवक शुभम धुत तसेच योगेश पर्वचे सर्व सहकारी उपस्थित होते.

