जिल्हाधिकारी यांनी अल्पसंख्याक बैठक घ्यावी नसता  लोकसेना आंदोलन करणार-अ‍ॅड.प्रा.इलियास इनामदार

Beed

बीड /बीडसत्ता प्रतिनिधी
जिल्हाधिकारी यांनी अल्पसंख्याक बैठक घ्यावी नसता लोकसेना आंदोलन करणार असे लोकसेना प्रमुख अ‍ॅड. प्रा. इलियास इनामदार अशी माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.

दर वर्षी 18 डिसेंबर रोजी जागतिक व राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर अल्पसंख्याक हक्कदिन साजरा केला जातो. परंतु या वर्षी 13 डिसेंबरला लोकसेना संघटना व 15 डिसेेंबरला मार्टी कृती समिती यांनी बीड जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्कदिन साजरा करावा व सोबत जिल्ह्यातील तमाम कार्यालय प्रमुख यांना बैठकीला बोलवावे अशी मागणी केली होती परंतु काही कारणानिमित्त जिल्हाधिकारी   या  बैठकीला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. परंतु अप्पर जिल्हाधिकारी कुलकर्णी  यांच्याशी चर्चा करून आपण लवकर बैठकीचे आयोजन करू असे आश्‍वासन दिले होते परंतू डिसेंबर महिना संपत आला तरी जिल्हाधिकारी यांनी बैठकीचे आयोजन केल्याचे दिसत नाही. जिल्हाधिकारी यांनी खालील कार्यालय प्रमुख यांना बैठकीला हज़र राहण्याचे निर्देश द्यावे जसे पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक, तहसीलदार, एसडीएम, जात वैलिडिटी अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, वक़्फ़ अधिकारी, मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, बँकेचे लिड डिस्टिक्ट मॅनेजरसह अल्पसंख्याक समाजाशी संबधित असणारे जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख यांना आपण निर्देश देवून बैठकीला बोलवावे व बीड मतदार संघाचे आ. संदीप क्षीरसागर व  महाराष्ट्र वक़्फ़ बोर्डचे राज्य सदस्य समीर काज़ी यांना पण बैठकीमध्ये बोलवावे आणि तात्काळ अल्पसंख्याक हक्क दिनाची बैठक घेवून समाजाचे प्रश्‍न मार्गी लावावे अशी मागणी लोकसेना संघटनेचे प्रमुख अ‍ॅड.प्रा.इलियास इनामदार यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.सदरील बैठक बोलविली नाही तर लोकसेना संघटनेचे प्रमुख अ‍ॅड.प्रा.इलियास इनामदार व कार्यकर्ते आंदोलनाचा पावित्रा उचलतील असे निवेदनात म्हटले आहे.