ग्रा.पं.सदस्य तथा पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

Beed

नेकनूर /बीडसत्ता प्रतिनिधी
पत्रकारितेच्या माध्यमातून केवळ सामाजिक प्रश्‍नांना वाचा फोडणे हे काम नाही. तर समाजातील लोकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करुन त्यांना न्याय मिळवून देणेही गरजेचे आहे . या दोन्ही भुमिका पार पाडतांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून समाजातील वृद्धांच्या आयुष्यांना प्रकाशमान करण्याचा निर्णय ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार अशोक शिंदे यांनी मागील पाच वर्षापासून घेतला आहे . वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून वयोवृद्धांच्या व नजर धुसर झालेल्या लोकांच्या आयुष्यात प्रकाश देण्याचं काम ते करणार आहेत. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. रविवार दि.31 डिसेंबर सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत स्त्री व कुटीर रुग्णालयात हे शिबीर पार पडणार आहे . 

नेकनूर सारख्या ग्रामीण भागातून पत्रकारिता करतांना वंचित , उपेक्षीतांचे प्रश्‍न मांडण्याचं काम अशोक शिंदे यांनी सातत्याने केले आहे.आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून पिडीतांना न्याय देण्याचं काम त्यांनी सातत्याने केले आहे . सामाजिक भान ठेवून पत्रकारिता करतांना अडल्या नडल्यांचे प्रश्‍न सोडवण्याचे काम ते सतत करत असतात . राजकीय, सामाजिक , क्रिडा, कृषी, कला , शिक्षण सारख्या क्षेत्रातील वंचित व उपेक्षीतांना न्याय देण्याच काम त्यांनी सातत्याने केले आहे . परंतू पत्रकारिता व बातमीदारीच्या पुढे असलेल्या सामाजिक बांधिलकीचे भान शिंदे यांनी राखले आहे.
 दि .1 जानेवारी असलेल्या त्यांच्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे , जन्मदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोफत  शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . रविवार( दि .31 ) डिसेंबर रोजी नेकनूर येथील कुटीर रुग्णालयात या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सदर शिबीर आहे. तज्ञ डॉक्टरांकडून या शिबीरात रुग्णांची तपासणी केली जाणार आहे . तसेच गरजू रुग्णांचर मोफत शस्रक्रिया केल्या जाणार आहेत.यामध्ये रुग्णांना शखक्रियेसह प्रवास,जेवण मोफत दिले जाणार आहे . नेकनूरसह परिसरातील रुग्णांनी व नागरिकांनी या शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन कै आण्णासाहेब पाटील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे