विभागीय नियंत्रक अजय मोरेंच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचे बेहाल

Beed

बीड बस स्थानकावर काम चालू असल्यामुळे प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी-जे.डी.शाह
बीड/बीडसत्ताप्रतिनीधी 
 गेल्या अनेक वर्षापासून बीड येथील नवीन बसस्थानकाचे काम चालू असुन ते पुर्ण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाचे शेड उभारुन प्रवाशांची व्यवस्था अतिशय चुकीच्या पध्दतीने करण्यात आली असून सदर ठिकाणी प्रवाशांचा कोणत्याही प्रकारच्या सोयीचा किंवा सुरक्षितताचा विचार करण्यात आला नाही. कारण बसमध्ये चढण्यासाठी व बसण्यासाठी उत्तरेकडे बसे उभी करण्यात येत आहेत. व प्रवाशांना थांबण्यासाठी व  बसण्यासाठी दक्षिणेकडे तात्पुरते शेडची उभारणी करण्यात आली आहे.तसेच सदर ठिकाणी मोठी-मोठी खडी टाकण्यात आली त्यावर मुरुम टाकून दबाई देखील करण्यात आली नसुन .जेणे करुन  टायर्स खालील उघड्या या खडीच्या तुकडयामुळे प्रवाशांच्या  जीवितास धोका निर्माण होवून जिवीतहानी होवू शकते. याला सर्वस्वी परिवहन महामंडळाचे नियंत्रक अजय मोरे यांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. यामुळे प्रवाशांनी सदर ठिकाणी सावधगिरी बाळगून प्रवास करावा. असे अवाहन सामाजिक कार्यकर्ते जे.डी. शाह यांनी केले आहे.
पूढे प्रसिघ्दी पत्रकात पुढे म्हटले आहे की, बाहेरगावाहून येण्या-जाण्यासाठी जिल्हा परिवहन नियत्रंक अजय मोरे याच्यां देखरेखीखाली प्रवाशी शेडची उभारणी करण्यात आली. मात्र याठिकाणी  प्रवाशांच्या सुरक्षितेचा व सोईचा कोणत्याही प्रकारे विचार करण्यात आला नाही.कारण तात्पुरते प्रवाशी शेड हे दक्षिणेकडून उभारण्यात आलेली आहे. व प्रवाशांना बसमध्ये बसण्यासाठी या शेडकडून पुर्व पश्‍चिम तोंड करून  उत्तरेकडे चढण्यासाठी उतरण्यासाठी पायर्‍या  असलेली बसच्या समोरुन-पाठीमागून बसमध्ये जागा मिळविण्यासाठी जेष्ठ वयवृध्द अंपग लहान मुलांना जिव मुठीत घेवून धाव घ्यावी लागते,यामुळे जिवीतास धोका निर्माण होवू शकतो,याचा कोणत्याही प्रकारचा विचार करण्यात आला नाही. तसेच सदर ठिकाणी जी खडी टाकण्यात आली आहे.त्यामुळे देखील प्रवाशांना मोठ्या-प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सदर खडी ही पुर्णतःउघडी असून त्याची कोणत्याही प्रकारची मुरुम टाकून दबाई करण्यात आले नाही.सदरील प्रवाशी गाडी पकडण्यासाठी पळतात तेव्हा खडीवरून पाय घसरून पडतात व दु:खापत होते.बसच्या वजनामुळे टायरखालून खडीचे तुकडे निसटून प्रवाशांच्या शरीराच्या कोणत्याही भागावर इजा होण्याचा धोका निर्माण होवू शकतो त्यामुळे प्रवाशांचा जागीच मृत्यू ओढावू शकतो.यासर्व गैरसोयीला जिल्हा परिवहन नियंत्रक अजय मोरे हेच जबाबदार असुन भविष्यात काही अनुचित प्रकार घडला व प्रवाशांच्या जिविता धोका झाल्यावर संबंधितांवर मनुष्य  वधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल तरी बीड बस स्थानकाचे बांधकाम चालू असल्यामुळे प्रवाशांनी सावधगिरी बाळगून स्वतःच्या जिवाची दक्षता घेउन प्रवास करावा. असे अवाहन सामाजिक कार्यकर्ते जे.डी.शाह यांनी केले आहे.