आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघामध्ये चक्क भूमी  अभिलेख नकाशावरील सरकारी रस्ते झाले गायब

Ashti

वेळोवेळी अनेक कार्यालयाकडे तक्रार करूनही घेतली जात नाही दखल-रवी ढोबळे 
आष्टी/बीडसत्ता प्रतिनिधी
दिनांक 6 जून 2023 रोजी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ (मुंडे) यांना आष्टी तालुक्यातील सरकारी रस्ते पाटबंधारे विभागाचा कालवा रस्ते ,सर्विस रोड अतिक्रमित झाले असून सदरील रस्ते खुले करणे बाबत प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन दिले होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभाचे अध्यक्ष रवी (काका) ढोबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सरकारी रस्ते तसेच पाटबंधारे विभागाने तयार केलेले कालवे त्यांच्या शेजारचे रस्ते, सर्विस रोड,आनंद रस्ते, शिव रस्ते हे धन दांडगे शेतकर्‍यांकडून अतिक्रमित झालेले असून गोरगरीब शेतकर्‍यांना हे रस्ते बंद झाल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आष्टी तालुक्यातील धामणगाव, दौलावडगाव ,दादेगाव, आष्टी ब्रह्मगाव, पाठशाला पांढरी, डोंगरगण, हरिनारायण आष्टा, शिराळ या अनेक ठिकाणी भूमि अभिलेख कार्यालयातील नकाशावर असणारे रस्ते अतिक्रमित झाल्यामुळे बंद झालेले आहेत त्यामुळे शेतकर्‍यांना हक्काचे असणारे रस्ते वापरास मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या बांधावरून  ये-जा करावी लागत आहे. पर्यायने अनेक शेतकर्‍यांमध्ये वाद निर्माण होत आहेत याच वादामुळे पोलीस स्टेशनला तक्रारी वाढत आहेत तहसील कार्यालय शेतामध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ते  मागणी वाढल्याने नको ते महसुली कायद्याचा वापर करून तहसीलदार चुकीचे आदेश करत आहेत त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये अनेक ठिकाणी वाद-विवाद तसेच तालुका महसूल, न्यायालय प्रांत महसूल, न्यायालय जिल्हा महसूल या ठिकाणी विनाकारण न्याय मागण्यासाठी वेळ खर्च करावा लागत आहे आणि वेळ खर्च करूनही समाधानकारक न्याय न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे तेव्हा आष्टी मतदार संघात सार्वजनिक बांधकाम विभाग सरकारी मालकीचे रस्ते भूमाफियांनी गिळंकृत केलेले आहेत आणि सदरील रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे सदरील पूर्वपार असलेले रस्ते नष्ट केल्यामुळे शेतकरी व नागरिक यांनी अनेक तक्रारी तहसील कार्यालयाकडे केलेले आहेत परंतु अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही आणि गावांमध्ये सरकारी रस्त्यावर फळबागा, शेत तलाव स्वतःच्या मालकीच्या सिंचन विहिरी तसेच नैसर्गिक पाण्याचे स्रोत बंद करून बदलून शेतकर्‍यांची आडवनूक केली जात आहे.शेतकर्‍यांनी इतर ठिकाणाहून रस्ते उपलब्ध करून द्यावेत अशा मागण्या वाढलेले आहेत त्यामुळे अनेक गावी वाद-विवाद उद्भवल्याचे घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी कायदा आणि संस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे दिसून आलेले आहे अशी तक्रार करून देखील सहा महिने उलटले तरीही आपल्या कार्याकडून कुठलीही कारवाई झालेली अथवा दखल घेतलेली दिसून येत नाही.
सदरील तक्रारीच्या नाराजीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी 19 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी बीड यांना स्मरणपत्र देऊन आष्टी मतदार संघात आष्टी महसूल न्यायालयाने न्याय निर्णय देऊन दोन वर्षे उलटले तरीही आदेशाची अंमलबजावणी होत नाही रस्ते खुले केले जात नाहीत तेव्हा संबंधित महसूल प्रशासनाधिकारी व कर्मचारी महसूल कायद्याची अंमलबजावणी न करता शेतकर्‍यांमध्ये चुकीचे मार्गदर्शन करून आपापसात भांडण लावण्याचे काम करताना स्पष्ट दिसून येत आहे तेव्हा सदरील आदेश व सत्य पुरावे यांची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना सेवा निलंबित करण्यात यावे आणि सरकारी मालकीचे सरकारी नकाशावरील सरकारी रस्ते खुले करण्यात यावेत असे जिल्हाधिकारी बीड उपविभागीय अधिकारी पाटोदा यांना दिलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे.

--------------------

महसूल न्यायव्यवस्थेने न्यायदानासाठी दिलेल्या खुर्चीतून न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्‍न निर्माण झाला आहे जिल्हाधिकारी साहेब आपण तरी यामध्ये लक्ष घालून तुमच्या अधिनिस्त कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांना समज देऊन काम करण्यास सांगितले तर अधिकाधिक योग्य राहील अन्यथा न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्‍न अनुत्तरीत राहील असे मत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आष्टी विधानसभा अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी व्यक्त केले.

----------------------