युवासेना जिल्हाअध्यक्ष अजय सुरवसे यांनी गरजूवंतांना दिली मायेची उब... 

Beed

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराचा वसा पुढे कायम सुरु ... 
बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
बीडजिल्हा युवासेनेचे जिल्हाअध्यक्ष अजय सुरवसे यांच्याकडून बीड शहरातील गरजूवंतांना काल रात्री उबदार शाल वाटप करण्यात आल्या . बीड शहरातील अनेक भागात हा मायेच्या उबीचा उपक्रम राबवण्यात आला . या केलेल्या उपक्रमाबद्दल बीड शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून व नागरिकांकडून अजय सुरवसे यांचे तोंडभरून कौतुक केले जात आहे . या उपक्रमाला युवासेनेच्या अनेक पदाधिकार्‍यांनी चांगलाच सहभाग नोंदवलेला दिसून आला . 

बीडजिल्हा युवासेनेचे जिल्हाअध्यक्ष अजय सुरवसे यांच्याकडून काल रात्री बीड शहरातील अनेक भागात गरजूवंतांना 100 ब्लँकेट वाटप केली गेली . या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार पुढे चालवत आहोत असा समाज संदेश दिला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिलेली शिकवण व समाजसेवेची पताखा सोबत घेऊन आम्ही असे समाजकार्य करत राहू . असा देखील संदेश यावेळी युवासेनेच्या वतीने गरजूवंतांना देण्यात आला आहे  .
मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये कडाक्याची थंडी पडल्याने राज्यामध्ये तसेच शहरांमध्ये  थंडीचे वातावरण तयार झालेले आहे . याच अनुषंगाने बीड येथील युवासेनेच्या वतीने जे लोक बेघर आहेत अशा लोकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरातील विविध भागात 100 ब्लँकेट वाटप करण्यात आली आहेत.  हे ब्लँकेट  पुढील परिसरात  वाटप करण्यात आली यामध्ये जिल्हारुग्णालया , बसस्थानक ,शाहूनगर ,बशीरगंज ,तहसील कार्यालय अशा अनेक ठिकाणी हे 100 ब्लँकेट वाटप करण्यात आली आहेत . यावेळी या उपक्रमाला सहकार्य केलेले शेखर घाडगे ,आतिष मेखे ,ऋषिकेश गायसमुद्रे ,वामन घोडके ,रोहन मेखे ,विक्की जाधव ,ओमकार लांडे आदी होते .