एससी,एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केल्याची  श्‍वेतपत्रिका मुख्यमंत्रींनी जाहीर करावी- डॉ .ओव्हाळ 

Beed

जनआंदोलन छेडण्याचा इशारा 
बीड/ बीडसत्ता प्रतिनिधी
आरक्षणाचा खेळ मांडल्याची प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री यांनी एससी,एसटी आरक्षणाबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी शनिवारी केली.

या बाबत डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगीतिले कि या राज्यात जातीवादी भूमिकेतून एससी,एसटी आरक्षणाची अंमलबजावणी परिपूर्ण होत नाही प्रत्येक ठिकाणी एससी,एसटी आरक्षणाची वाट कोणी लावली एससी,एसटी च्या जागा पुर्ण भरल्यात का असा प्रश्‍न उपस्थित करून बकलॉक का राहींला याचा खुलासा मुख्यमंत्री यांनी करून आजवरच्या अंमलबजावणी बाबत श्‍वेतपत्रिका कढा किती जागा भरल्या आणि किती जागा गोटावल्या याचा खुलासा होणं गरजेचं असून  आंबेडकरी जनतेची आजवर फसवणूक केली असल्याचा आरोप डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केला मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या पण अंमलात आणल्या नाही यासाठी जनजागृती करून जनआंदोलन छेडण्याचा इशारा देत तातडीने श्‍वेतपत्रिका कडा आशी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी शनिवारी केली आहे