द .बा. घुमरे पब्लिक स्कूलच्या प्रयोगाची राष्ट्रीय स्तरावर निवड  

बीड/ बीडसत्ता प्रतिनिधी         

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली व शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी पुणे  यासाठी जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनांमधून उत्कृष्ट मराठवाड्यातून एकूण 11 प्रयोगाची निवड करण्यात आली

त्यामध्ये द .बा. घुमरे पब्लिक स्कूल माध्यमिक गेवराईच्या इयत्ता नववीतील विद्यार्थी चिरंजीव पवार कार्तिक गणेश याने सादर केलेल्या लेझर मायक्रोस्कोप त्यामध्ये अशुद्ध पाण्यातील बॅक्टेरिया कसे ओळखावे याची माहिती  विस्तारित करण्यात आले आहे हे विज्ञान प्रदर्शन केज या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये या विद्यार्थ्यांची व त्याच्या प्रयोगाची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनामध्ये निवड करण्यात आली आहे यावर्षी होणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल माळुंगे  बालेवाडी पुणे या ठिकाणी  होणार आहे द बा घुमरे पब्लिक स्कूल ने बीड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवून संस्थेतील विध्यार्थाना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत स्थान पटकावले असून या संस्थेने एन एम एम एस , शिष्यवृत्ती परीक्षा , क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला असून बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे यावर त्याच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे , उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे , उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती निंबाळकर एमडी तसेच संस्थेचे सचिव माननीय श्री दीपक दादा घुमरे सह सचिव प्रदीप घुमरे शाळेचे मुख्याध्यापक तसेच विज्ञान विभाग प्रमुख थेटे सर शाळेतील शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालकांनी अभिनंदन केले आहे