पायी शिर्डीला येतो साईनाथा, भक्त गणांनी दिली हाक... 

Beed

26 डिसेंबरला बीड येथून पायी वारी जाणारं शिर्डीला ... 
बीड/ बीडसत्ता प्रतिनिधी
प्रतिवर्षी प्रमाणे देखील याहीवर्षी दत्तजयंती निमित्त  बीड या ठिकाणाहून बीड साई परिवाराच्या वतीने बीड ते शिर्डी पायी वारीचे आयोजन केले आहे.साई सेवा परिवाराच्या वतीने या पायी वारीचा 16 वर्षाचा प्रवास पूर्ण झाला आहे. व 17 वे वर्षात पदार्पण केले आहे.या पायी वारीचा आनंद लुटण्यासाठी जिल्हाभरातून साई प्रेमी सहभाग नोंदवत आलेले आहेत. 

बीड या ठिकाणी स्थित असलेल्या श्री साई सेवा परिवाराच्या वतीने गेली 16 वर्ष अखंड या पालखी सोहळयाचे आयोजन केले जात आहे . या पालखी पायी सोहळा बीड या ठिकाणच्या साई मंदिरापासून सुरु होतो . जालना रोड,माळवेस चौक,बलभीम चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच राजुरी मार्गे पालखी शिर्डीला मार्गी मार्गस्त होते.या पालखी मध्ये जिल्हाभरातील अनेक खेड्यापाड्यातून साई भक्त हे सहभाग नोंदताना दिसलेले आहेत .
या पालखी सोबत सागवानच्या झाड्याच्या लाकडापासून तयार केलेला रथ देखील साईंच्या पादुका घेऊन समवेत असतो. या चरण पादुकांची दर्शन घेण्यासाठी पालखी मुक्कामी थांबल्या ठिकाणी गावातील लोक मोठी श्रद्धा करतात . तसेच साई नामाचा गजर करत ही पालखी रोज अंतर मागे टाकत  शिर्डीकडे रवाना होते . तसेच या साई परिवाराच्या पायी  पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवणार्‍या साई भक्तांचा श्री साई सेवा परिवाकडून आरोग्य विमा देखील काढला जातो.या मागचे कारण असे की पायी पालखी असल्यानी अनावधानाने एखाद्या साई भक्ताला रस्त्यावरून चालणार्‍या वाहनांकडून काही हानी  झाल्यास पुढील खर्चाची जबाबदारी देखील साई परिवाराकडून घेतली जाते . 

साई परिवार तर्फे  जिल्हाभरातील भक्तांना आवाहन ... 
श्री साई सेवा परिवार बीड यांच्याकडून जिल्हाभरातील भक्ताना आवाहन करण्यात आले आहे कि ,साई पायी पालखी हि 26 डिसेंबर रोजी शिर्डी कडे प्रस्थान करणार आहे . या पालखी सहळ्यासाठी ज्या भक्तांना पालखी सोहळ्यात  सहभाग नोंदवायचा आहे अशा साई भक्तनि नाव नोंदणीसाठी पुढील संपर्क क्रमांका वतरी संपर्क करावा . 9405076594/9850088644 या सपंर्क नंबर वरती साई भक्तानी लवकरात लवकर संपर्क करून नाव नोदणी करावी असे आव्हान श्री साई सेवा परिवाराच्या वातींचे करण्यात आले आहे .