आरक्षण मिळूदे हिसकाच दाखवतोे-मनोज जरांगे  

Beed

मुंबई येथील आझाद मैदानावर आगेकूच
बीडसत्ता / युवापत्रकार
बीड येथे पाटील मैदान या ठिकाणी पारपडलेल्या निर्णायक इशारा सभेला महारष्ट्रातील कानाकोपर्‍यातून मराठा समाज बांधवानी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली होती .या निर्णायक इशारा सभेच्या रॅलीची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुभाष रोड मार्गे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मनोज जरांगे यांना जेसेबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व आर्शिवाद घेवून  बार्शी रोड मार्गे पाटील मैदानाकडे रवाना झाली.
पाटील मैदान बीड  या ठिकाणी निर्णायक इशारा सभा पार पडली  मनोज जरांगे यांच्या वर हेलिकॉप्टरच्या साह्याने पुष्पवृष्टी देखील करण्यात आली होती. यावेळी या सभेला पोलीस प्रशासनाच्या आकडेवारी नुसार या सभेसाठी एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्यासंख्येने मराठा समाज सहभागी झालेले होता.या सभेचे  व रॅलीचे वैशिष्ट्ये म्हणजे कोठेही कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार  किंवा गडबड न होता एकदम शांततेत ही रॅली व सभा पार पडली.या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, बंद असलेली हॉस्टेल तसेच सारथी योजनेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा.मुंबईत 18 डिसेंबरपर्यंत 144 लागू आहे.परंतु आम्ही 20डिसेंबरला मुंबईत येणार आहोत त्यावेळी आमच्या मराठा बांधवांनी आणलेली ट्रॅक्टर आडवून दाखवावी असा इशारा  देखील या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी  सरकारला दिला आहे.आम्ही मुंबईला आल्यावर आरक्षणच घेऊन जाणार असा शेवटचा इशारा देखील मनोज जरांगे यांनी यावेळी सरकारला दिला आहे . या निर्णायक सभेचे आयोजन व रॅलीचे नियोजन स्वयंसेवकांनी  यांनी अति उत्तमपणे केले.

----------------
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे  बीड शहरातील मुस्लिम बांधवांनी  केले स्वागत  व शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीतील सहभागी  मराठा बांधवांना  पिण्याच्या  पाण्याच्या बॉटल्स व नाश्त्याची व्यवस्था केली. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, समाजसेवक जावेद कुरेशी(भैय्या),शिवसेनेचे निजाम शेख,सह सर्वच गटाचे पक्ष संघटनेचे मुस्लिम नेते पदाधिकारी दिसत आहेत.
-----------------

आंदोलनाची तारीख  ठरली ...
बीड या ठिकाणच्या पाटील मैदानावरील सभेतून मनोज जरांगे  पाटील यांनी सर्व मराठा बंधू भगिनींना विश्‍वासात घेत 20जानेवारीला आमरण उपोषणाची तारीख ठरली आहे. या तारखेला मनोज जरंगे हे मुंबई येथील आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत.

मराठायोद्धा जरांगे पाटलांनी घेतला ‘दादा’चा आर्शिवाद
बीड/प्रतिनिधी
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे निर्णायक इशाराच्या सभेनिमित्ताने बीड शहरात आगमन झाल्यानंतर त्यांची भव्य रॅली काढण्यात आली. माजीमंत्री शिवाजीराव पंडित(दादा) यांच्या शिवछत्र निवास स्थानासमोर वाहनातून उतरत मनोज जरांगे पाटील यांनी शिवछत्र परिवाराच्या स्वागताचा स्विकार केला. बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्माचार्य माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित व मनोज जरांगे पाटील यांनी एकमेकांची  गळाभेट घेतली. शिवछत्र परिवाराच्यावतीने शिवाजीराव पंडित यांनी केलेल्या हृदय स्वागताचा स्विकार जरांगे पाटील यांनी केला. शिवछत्र परिवार मराठा आरक्षणाच्या लढाईत सदैव समाजाबरोबर असल्याचे शिवाजीराव पंडित यांनी यावेळी सांगितले.
शिवछत्र परिवाराच्यावतीने मिरवणुकीतील सहभागी समाज बांधवांसाठी चहा, नाष्टा व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. जेसीबी मधून मराठा योध्दा जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवछत्र परिवाराच्यावतीने करण्यात आलेल्या हृदय सत्काराचा स्विकार मराठा योध्दा मनोज पाटील जरांगे यांनी तेवढ्याच आत्मीयतेने केला. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित समाज बांधवांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला.मराठा आरक्षणाच्या आंदोलनात माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित व शिवछत्र परिवार सातत्याने सक्रीय सहभाग नोंदवत आहे. मराठा क्रांती मुकमोर्चा असेल किंवा इतर आंदोलनात आपल्या वयाचा विचार न करता शिवाजीराव पंडित रस्त्यावर उतरून आजवर प्रत्येक आंदोलनात सहभागी झालेले आहेत. समाजाच्या विविध उपक्रमांत शिवछत्र परिवार नित्य सहभागी असतो. आंतरवाली सराटे येथील आंदोलकांवर झालेल्या निर्दयी लाठी हल्ल्याचा सुध्दा शिवाजीराव पंडित यांनी निषेध व्यक्त केला होता. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आंतरवाली येथे जावून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.