निर्णायक इशारा सभेला बहुसंख्येने  उपस्थित राहावे - अनिल जगताप 

Beed

जवळा/ बीडसत्ता प्रतीनिधी
23 तारखेला बीड या ठिकाणी होणार्‍या मनोज जरांगे यांच्या निर्णायक इशारा सभेला मराठा समाज बांधवानी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आज बीड तालुक्यातील जवळा या ठिकाणच्या बैठकीत माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे.यावेळी गावातील मराठा समाज बांधवांची या बैठकीला मोठ्यासंख्येने लोक उपस्थिती दिसून आले. मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली डेडलाईन काही दिवसातच संपणार आहे.

तोंडावर येऊन ठेपली असून देखील शासन स्थरावर मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेले नाहीत. यावरच मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची या प्रश्‍नावर मार्ग काढण्याची बीड या ठिकाणी 23डिसेंबर रोजी ‘निर्णायक इशारा’ सभाचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे या सभेसाठी समाजात जनजागृती व आयोजनाचे कामाचे नियोजन करत आहेत.बीड तालुक्यातील वाड्यावस्ती पर्यंत पोहचून अनिल जगताप हे जनजागृतीचे काम करत आहेत. मराठा समाजाला देखील समान न्याय हक्क मिळायला हवा असा मनात ध्यास घेऊन जगताप हे कंबर कसू कमला लागलेले आहेत.याच सभेचा अनेक जबाबदार्‍या जगताप यांच्या खांद्यावर असल्याने  सभेचे निजोजन चांगलेच कटिबद्ध होणार आहे . बीड तालुक्यातील म्हळस जवळा या ठिकाणी आपल्या समवेत पदाधिकार्‍यांना सोबत घेवून निर्णायक सभेसाठी सर्व समाज बांधवानी येत्या 23 तारखेला सहकुटुंब उपस्थित रहावे असे बैठकीत आवाहन माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे . यावेळी या बैठकीला सुनील अनभुले ,सुदर्शन धांडे ,आखिल भारतीय मराठा महासंघाचे किशोर गिराम व मराठा समाजातील गावातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यावेळी होती. 

आता नाही तर पुन्हा कधीच नाही-ज्ञानेश्‍वर खांडे 
म्हळस जवळ येथील  सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर खांडे यांनी जवळा या ठिकणी  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी बोलताना त्यांनी या ठिकाणी जमलेल्या मराठा बांधवांना  ‘निर्णायक सभे’साठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देखील केले. आता नाही तर पुन्हा कधीच नाही अशा परखड भाषेत त्यांनी या वेळी मराठा समाज संभोधित केले. तसेच गावातील वाड्यावस्तीतील मराठा समाज बांधवानी या सभेला मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे देखील आवाहन या वेळी ज्ञानेश्‍वर खांडे यांनी केले.