जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला  बँकांकडून केराची टोपली कायम

Beed

 

बीडसत्ता / युवापत्रकार 
केंद्र व राज्यशासनाकडून सन्मान निधी व नमो सन्मान निधी यांचे 2000 रु जमा होत आहेत . हि रक्कम खात्यावर जमा होत असल्याने जिल्हातील बँकेकडून शेतकजार्‍यानी पिककर्ज परतावा न केल्याने खात्याला होल्ड करत आहेत . यांचं  प्रश्‍नावर मागील काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी बँकांनी शेतकर्‍यांची वरील योजनांच्या रक्कमेची अडवणूक करू नये असे आदेश काढले होते .
 महाराष्ट्रतील शेतकरी दिवसेंदिवस आस्मानी व सुलतांनी संकटाना समोर जात आहे. या संकटात शेतकरीच्या पाठीशी कोणाचा तरी आधार असावा मानून केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी अर्थसहाय्य सन्मान निधी व नमो सन्मान निधी या दोन योजना  आम्लात आणल्या आहेत. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना 2000 रु इतकी मदत दोन्ही योजने अंतर्गत मिळत आहे. या मदतीमधून शेतकर्‍यांना अल्प खरेदीला चांगल्या पैकी आर्थिक हातभार लाभत आहे .
यावरच काही शेतकरी या योजना आम्लात येण्या अगोदर शेतीसाठी बियाणे व खते खरेदी  करण्यासाठी  जिल्हातील बँकांकडून पीक कर्ज हस्तगत केलेले होते. मात्र दुष्काळी व अवकाळी परिस्थितीमुळे शेतातील हाततोंडाला आलेला घास शेतकर्‍याला न मिळाल्याने शेतकर्‍यांना या पिकातून कोणतांही आर्थिक प्राप्ती झाली नाही . आर्थिक प्राप्ती न झाल्याने बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा कोणत्याही शेतकर्‍याला परतावा करता आला नाही . हा आर्थिक परतावा न केल्याकारणाने अनेक बँकांनी पीककर्ज बोजा असलेल्या शेतकर्‍यांचे खाते हे होल्ड केले आहेत .
वरील प्रश्‍नावर मार्ग म्हणून बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीप मुधोळ यांनी जिल्हातील सर्व बँकांना अधिसूचना काढल्या होत्या . या अधिसूचनेमध्ये असे नमूद केलेले होते कि , सध्याच्या परिस्थितीत जिल्हातील शेतकरी मोठ्या आर्थिक समसेला तोंड देत आहे. या परिस्थिती बँकांनी कोणत्याही आट्टी व शिर्ती शेतकर्‍यांनावर लागु करू नयेत अशी अधिसूचना सर्व बँकांना यावेळी  दीप मुधोळ यांनी दिली होती.

 

जिल्हाधिकारी मॅडम शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर कधी निघणार मार्ग

बीड येथील सामाजिक कार्यकर्ते शेतकर्‍यांच्या संकटात मार्ग काढण्यास नेहमी अग्रेसर असलेले समाज सेवक यांनी जिल्हाधिकारी दीप मुधोळ याना वरील विषयी निवेदन देऊन हा प्रकार थांबवण्याची विनंती केली आहे. निवेदनात नमूद केल्या प्रमाणे जिल्हधिकारी यांनी त्यांच्या पातळीवर या प्रकारची चौकशी करून आपण दिलेल्या आदेशाची ज्या -कोणत्या बँकात आदेशाची अंमलबजावणी होता नाही त्या बँकांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी जे.डी. शाह यांनी निवेदनातून केली आहे .

आजघडीला मला रब्बी हंगामातील बियाणे खरेदी करायला देखील खिशात एक फुटकी दमडी देखील नाही. बीड या ठिकाणच्या महराष्ट्र बँक या ठिकाणी माझा बँक खात्यावर 3000 एवढी रक्कम शिल्लक असून देखील या ठिकाणच्या अधिकार्‍यांकडून असे सांगितले जात आहे. कि आपण पीक कर्ज घेतलेली रक्कम जोपर्यंत परताव करत नाहीत तो पर्यंत आपल्या खात्यावरील रक्कम आपल्याला काढता येणार नाही. माझ्याकडे पैसे नसल्याने मी शेतीसाठी उपयुक्त इतर कोणतेही साधने खरेदी करू शकत नाही. पैसे मिळत नसल्याने माझ्यावर व माझ्याकुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. 
                --शेतकरी भागवत साळवे