आत्महत्या ग्रस्त कुटूंबाला करूणा मुंडे यांची मदत

धारूर/बीडसत्ता प्रतिनिधी
धारूर तालुक्यामध्ये कासारी बोडखा या गावात लक्ष्मण माणिक बडे या शेतकरी नवतरुणाने आत्महत्या केली असे समजताच स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे सांत्वनपर भेट दिली भेट दिला दिल्यानंतर गावामध्ये असलेलं विदारक दुःख सर्वांच्या समोर आलं एखाद्या घरातला करता पुरुष गेल्यानंतर त्याच्या मागे कुटुंब उघड्यावर ती पडलेलं नजरेस भावलं त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुलं एक आई आणि पत्नी असा उघड्यावर पडलेला पांढरा परिवार नजरेस आला या विदारक दुःखाला कारणीभूत कोण दोन एकर माळरान जमीनीवर या परिवारांना जगायचं कसं हा प्रश्न पडला आणि खर्या अर्थानं करूणा दाखवत आमच्या स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा मुंडे यांनी या परिवाराला पाच हजाराची मदत करीत केली., तसेच मयत मुलाच्या आईने तलाठी कार्यालयास वारंवार चकरा मारूनही काहीच ना काहीच काम न करणार्या अकार्यक्षम तलाठी आलूरे मॅडमला तात्काळ फोन लावला आणि फेरफार चे त्यांचे काम केले आणि विशेष म्हणजे अशाच कुणाच्या घरात महाराष्ट्रात भरपूर लोकांना घरकुल योजनेचा लाभ भेटला नाही गाव सोडून शेतात राहणार्या लोकांना शेतीचा पिक विमा ही भेटला नाही त्यामुळे गरिबांचा वाली कोण? हा प्रश्न व्यवस्थेला पडलेला आहे त्यामुळे हा प्रश्न करुणा मुंडेंनी स्वतःच्या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेला आहे आणि असे आवाहन केले सरळ हाताने या परिवाराला या तालुक्यातील आणि या जिल्ह्यातील राजकीय व्यावसायिक आणि प्रशासकीय लोकांनीही सढळ हाताने मदत करावी आणि या कुटुंबाचे पुनर्वसन करावं राष्ट्रवादी काँग्रेसचे धारूरचे तालुकाध्यक्ष प्रशांत बडे तसेच कासारी बोडखा गावातील समस्त गावकरी उपस्थित होते.

