शासकीय कार्यालयात सार्वजनिक स्वच्छातागृह दाखवा आणि बक्षीस मिळवा

Beed

अनेक शासकीय कार्यालयात जागा उपलब्ध असतांना देखील स्वच्छातागृह नाही
बीडसत्ता / युवपत्रकार 
 जिल्हाच्या ठिकाणी अनेक मुख्यकार्यालय असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिलांना कामकाजासाठी शासकीय कार्यालयात यावे लागते . याठिकाणी कामकाजानिमित्त आल्यानंतर महिलांसाठी या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छालय नसल्याने महिलांची नेसर्गिक विधीसाठी कुचंबणा होत आहे. शासकीय कार्यलयाच्या परिसरात सार्वजानिक स्वच्छालय शासकीय कार्यालयाच्या परिसरात सार्वजानिक स्वच्छातागृह उभे करावेत अशी महिला वर्गातून मागणी होत आहे .
बीड जिल्ह्याचे ठिकाण असल्याकारणाने या ठिकाणी सगळेच शासकीय कार्यालये आहेत . शासकीय योजनांच्या कामकाजासाठी किंवा इतर कामासाठी शहरातील व ग्रामीण भागातील महिलांना या कार्यालयामध्ये यावे लागते . कार्यालयीन स्वछतागृह या ठिकाणी अस्थित्वात आहेत मात्र बाहेर गावाहून येणार्‍या महिलांना त्या स्वछतागृहाची माहिती नसल्याने त्यांना अनेक वेळा नेसर्गिक विधीच्या प्रश्‍नाला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र अनेकवेळा  दिसत आहे . 
जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या या ठिकाणच्या कार्यालयामध्ये हा गंभीर प्रश्‍न डोके वर काढताना दिसत आहे . यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय , तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हापरिषद काार्यालय,महिला व बालकल्याण कार्यालय, नगरपरिषद कार्यालय,सामाजिक न्याय भवन कार्यालय,निबंधक कार्यालय (रजिस्ट्री ऑफीस) ,कोषागृह कार्यालय अशा अनेक ठिकाणी महिलावर्गांची जास्त प्रमाणात आवकजावक असते . वरील कोणत्याही ठिकाणी महिला सार्वजनिक  स्वछतागृह नसल्याने महिलांना अनेक वेळा परिसरामध्ये उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी इच्छा नसतानाही बसावे लागत आहे. 

स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने इशारा 
स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करूणा मुंडे यांनी वरील प्रकारावर काही महिन्यात तोडगा न निघाल्यास स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने वरील कार्यालयामध्ये स्वखर्चने हे स्वछतागृह तयार करू . मात्र या स्वछतागृहासाठी येथील नगर परिषद मुख्याधिकारी निता अंधारे यांनी  कार्यालकीयन परिसरात स्वच्छतागृहाला जागा उपलब्ध द्यावी अशा मागणी केली आहे. अन्यथा या ठिकाणी येणार्‍या सर्व महिलांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यलयासमोर  निदर्शने केले जाईल असे देखील त्यांनी वक्तव्य केले आहे.

शासकीय कार्यालयात अनेक कामकाजासाठी घराबाहेर पडलेल्या महिलांसाठी कार्यालयाच्या परिसरात स्वतंत्र व सार्वजनिक स्वछतागृहाची व्यवस्था नाही . या कारणामुळे मानसिक व शारिरीक कुचंबणा होते आहे. 
    -अनिता शिंदे ,सामाजिक कार्यकर्त्या