माजीमंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या प्रयत्नाला यश

Beed

नव्या सुसज्ज बसस्थानकाच्या कामाला सुरुवात

बीड/बीडसत्ता प्रतिनिधी 

गेल्या अनेक वर्षांपासून बीडकरांचे नव्या बसस्थानकाचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे,माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे,लवकरच बीडच्या नव्या आणि सुसज्ज अशा सर्वसोयींनी युक्त अशा बीड बस स्थानक व बस आगाराचे काम सुरू झालेले आहे,आज माजीमंत्री क्षीरसागर यांनी कामाची पाहणी केली.
आज माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीडच्या नव्या होत असलेल्या बसस्थानकाच्या बांधकामाची पहाणी केली यावेळी विभागीय नियंत्रक मोरे,काझी संघानि कन्स्ट्रक्शनचे समीर काझी अतुल संघांनी,जगदीश काळे दिनकर कदम,अरुण डाके,गंगाधर घुमरे, गणपत डोईफोडे,अरुण बोंगाणे, मुखीद लाला,दादासाहेब मुंडे,राणा चव्हाण,आशिष काळे,अर्जुन बहिरवाळ, भागवत पौळ,प्रवीण सुरवसे,सुभाष क्षीरसागर,नाना मस्के,राजू आतकरे,कलंदर पठाण,बबन वडमारे,अजय धाडे,महेश गुजर,सुभाष गायकवाड, तौफिक पठाण,गोविंद जाधव,आदींसह आगारातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

बीड हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी असलेले सध्याचे बस स्थानक हे ५० वर्षा पूर्वी बांधलेले होते त्याची अत्यंत वाईट आवस्था झालेली आहे. बीड बस स्थानकातुन रोज राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून ८०० बसेस ची ये जा आहे. या बस स्थानकात मोठ्या प्रमाणांत प्रवासी प्रवासासाठी या बसस्थानकांचा वापर करतात या बसु स्थानकात कोणत्याही सोयी उपलब्ध नाहीत शौच्छालये मोडकळीस आलेले आहेत,आसन व्यवस्था नाही,स्वच्छता नाही, पाण्याची सुविधा नाही ज्या ठिकाणी बसेस थांबतात. त्या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते हा परिसर हि चिखलमय होतो.
या सर्व बाबी पाहता आपल्या कडे या बस स्थानकाबाबत आनेक पालकमंत्री
असतांना हे बसस्थानक व आगार नविन निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिल्या नंतर महाराष्ट्र शासनाने निधी बाबत अडचण सांगितल्या नंतर हे बस स्थानक बी.ओ. टि. तत्वावर निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता यात व्यापारी संकुल नविन बस स्थानक,नविन बस आगार व हे सर्व अद्यावत करण्याचा जवळपास १०० कोटीचा बी. ओ.टी. तत्वावर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला होता व त्यास तत्कालीन महाराष्ट्र शासनाने आपल्या पालकमंत्री पदाच्या
कालावधी मध्ये मंजुरी दिली होती. तत्कालीन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, जीवनराव गोरे यांच्या उपस्थितीत भुमिपुजन हि झाले परंतु दरम्यानच्या काळात विधान सभेच्या निवडणुका जाहिर झाल्यामुळे आचार संहिता लागल्यामुळे पुढील काम झाले नाही राज्यात सतांतर झाल्यामुळे पुढील सरकार मधील मंत्री दिवाकर रावते यांनी हा संपूर्ण प्रस्ताव प्रलंबित ठेवला व पुढे तो रद्द केला. बीड बस स्थानकांचे काम पुर्ववत सुरु व्हावे या साठी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या आमदारकीच्या काळात ४ वेळा विधान सभेत लक्षवेधी सुचना मांडत हे काम तातडिने व्हावे अशी मागणी केल्यानंतर बी.ओ.टी. तत्वावरील काम रद्द करुन ते महामंडळाकडुन करण्याचा निर्णय झाला, सुरुवातीला हा प्रस्ताव ६.०० कोटी रुपयाचा होता त्यात सुधारणा करुन तो मागणी केल्या नंतर १३ कोटी रुपयाचा करण्यात आला व या कामाचे पुन्हा भुमीपुजन तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे व तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत मंत्री असतांना करण्यात आला या वेळेस हि पुन्हा विधान सभेची निवडणूक लागली व हे काम पुन्हा प्रलंबित झाले. पुढील काळात माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातुन हे काम सुरु झालेले असून आज त्यांनी प्रत्यक्ष पहाणी केली, बस आगाराचे काम प्रगती पथावर आहे व बसस्थानकांचे काम अंतिम सुरू झालेले आहे.लवकरच या नव्या बसस्थानकाचे काम पूर्ण होणार असून काझी संघांनी ग्रुपच्या वतीने हे काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत,काझी संघांनी कन्स्ट्रक्शनने आष्टी,अंबाजोगाई आणि औसा येथील बसस्थानकाचे देखील काम केले आहे,22 वर्षांपासून हा ग्रुप बांधकाम क्षेत्रात काम करत असल्यामुळे बीडचे काम देखील त्याच तुलनेत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे,नविन व्यापारी संकुलाचे १०० कोटीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे समजते.