शॉर्टसर्किटमुळे ईट येथील गजानन सहकारी सुतगिरणीला आग

बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
बीड तालुक्यातील ईट येथील श्री गजानन सहकारी सूतगिरणीला शॉर्टसर्किटमुळे आज अचानक आग लागली या आगीत कापसाच्या गठन पेटल्या होत्या स्थानिक प्रशासनाने अग्निशामक दलाच्या चार गाड्या तातडीने मागवल्यामुळे आग आटोक्यात आली आहे या आगीत नेमके किती नुकसान झाले हे अद्याप कळु शकलेले नाही सूतगिरणीचे कर्मचारी अधिकारी सुरक्षित असून या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही ही सूतगिरणी माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांची असून गेली अनेक वर्षापासून या सूतगिरणी मधून राज्यांमध्येच नव्हे तर देशात तर देशाच्या बाहेरही या ठिकाणचे गठान पाठवले आणि ही नामांकित असलेल्या सूतगिरणीला आज अचानक शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत त्याचे नुकसान झाले आहे मात्र किती नुकसान झाले आहे हे काही वेळातच सुतगिरणी प्रशासन कळवणार आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन व अग्निशामक दलाने धाव घेतल्याने आग आटोक्यात आली आहे.

