बीड नगर परिषदेने लावलेल्या झाडांची कत्तल



अंधारे मॅडम घरमालक,दुकानदार कोणावर करणार कारवाई?
बीड//बीडसत्ता प्रतिनिधी
बीड शहरातील तुळजाई चौक ते एसबीआय बँक व कॅनॉल रोड लगत बीड नगर परिषदेने लावलेली अनेक झाडे कोणी तरी तोडली आहेत.बीड शहराचे माजी अध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमातून बीड शहराची शोभा वाढण्यासाठी व उन्हाळ्यात कोणालाही सावलीचा असरा घेता यावा यासाठी लावलेली होती.
परंतु बीड शहरातील अनेक झाडे सुभाष रोड,धोडीपूरा, बलभीम चौक,कारजा रोड, सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स,सिटी पोलिस स्टेशन ते मोंढा रोड,कॅनॉल रोड,माने कॉम्प्लेक्स रोड या परिसरातील अनेक झाडे एमएससीबीच्या कर्मचार्यांनी लाईटच्या पोलवरील तारेस अडथळा होत आहे. म्हणून तोडली आहेत. तर काही कोणाच्या दरवाजाच्या समोर आहे म्हणून किंवा कोणाचे दुकान झाडामुळे दिसत नाही तर अनेकांनी झाडे लाकडे जाळण्यासाठी बीड शहरातील झाडे तोडली आहेत. तरी नगर परिषदेने यावर्षी कोणावरच कायदेशीर कारवाई केलेली नाही. परंतु कारवाई केली असती तर अनेक झाडे तुटली नसती व नंतर अशी झाडे तोडायची कोणीही हिम्मत केली नसती.सदरील झाडे तोडली यांच्यावर अंधारे मॅडम काय कारवाई करतात याकडे अनेक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
झाडे तोडलेल्या नागरिकांवर कारवाई कधी होणार?
वरील परिसरामध्ये लावलेल्या झाडाची संगोपन करण्याची जबाबदारी घेणार्या कर्मचार्यांवर किंवा अधिकार्यांवर कारवाई होणार का ? होणार नसेल तर मग नागपरिषद या प्रकरणाची चौकशी करून संबंधित नागरिकांवर कायदेशीर कारवाई कधी करणार आहे असा सवाल या परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.
स्वच्छता निरीक्षक असून अडचण नसून खोळंबा
बीड शहरात सहा स्वच्छता निरीक्षक स्वच्छता विभागात कार्यरत असून देखील बीड शहरातील अनेक झाडे तोडत असतांना स्वच्छता निरीक्षक मुगगिळून गप्प बसले का होते? यांनी सदरील झाडे तोडली जात असतांना किंवा झाडे तोडल्याचे समजले असतांना एकावरही कायदेशीर कारवाई केली असती तर आज ही झाडांची कत्तल झाली नसती. मुख्याधिकारी निती आंधारे स्वच्छता निरीक्षक व तोडणार्या नागरिकांवर कायदेशी कारवाईचे आदेश देतील का असा प्रश्न येथील नागरिकांकडून केला जात आहे.

