बीडच्या अभिषेक दुधाळची इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेसाठी निवड

बीड/बीडसत्ता प्रतिनिधी 
येथील जाधव प्रोऍक्टिव्ह अबॅकस अँड कोचिंग क्लासेस मधील विद्यार्थी अभिषक दत्तात्रय दुधाळ या विद्यार्थ्याने दिनांक 12 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शासकीय इंजीनियर महाविद्यालय येथे झालेल्या मराठवाडा विभागीय अबॅकस स्पर्धायात ’विशेष प्रावीण्य मिळवले असून स्पर्धेत तो तिसरा आला आहे,त्याची कोल्हापूर येथे होणार्‍या इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे

या स्पर्धेत जालना,परभणी, हिंगोली,धाराशिव,बीड, लातूर, नांदेड,या सात जिल्ह्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते,बीडच्या चि.अभिषेक दत्तात्रय दुधाळ या विद्यार्थ्यांची निवड पुढील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी झालेली आहे,या स्पर्धेत लहान गटातून बालाजी गणेश दुधाळ याचाही सहभाग होता, पुढील स्पर्धा दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी कोल्हापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे.
जाधव अबॅकस अंड कोचिंग  क्लासेसचे एकूण सोळा विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे.
माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे अंगरक्षक दत्तात्रय दुधाळ यांचा मुलगा अभिषक याच्या निवडीबद्दल माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आणि प्रा राजू मचाले,डॉ अरुण भस्मे,कोचिंग क्लासेसचे जाधव सर, स्वीय सहायक गिरीश देशपांडे, अशोक जाधव,पत्रकार प्रशांत सुलाखे,बाबू बहिर,प्रकाश राठोड,बेग,परमेश्‍वर धारकर,आशिष काळे,अजय धाडे, पांडुरंग भस्मारे,पीएसआय राजू गुळभिले,व मित्र वर्गातून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहे