पशुधन संगोपन करणे काळाची गरज-डॉ. आगासे

नाळवंडी / प्रतिनिधी
बीड तालुक्यातील नाळवंडी या ठिकाणी पशुसेवा केंद्राचे डॉक्टर आगासे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन या अभियानाचा कार्यक्रम पार पडला . यावेळी डॉक्टर आगासे यांनी या अभियानातील विविध योजनांची माहिती गावातील पशुधन पालन करते शेतकरी वर्गाला दिली .
बीड तालुक्यातील नाळवंडी या ठिकाणचे पशुसेवा केंद्रचे डॉ यांनी आज गावातील शेतकऱ्यांना केंद्र शासना मार्फत राबवली जाणारी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन या योजनेमार्फत आपण शेती व्यवसाया बरोबरच आणखी शेतीपूरक कोणते व्यवसाय करू शकतो याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली . या योजने अंतर्गत कुक्कुटपालन अनुदान अधिकतम २५ लक्ष ,शेळी -मेंढीपालन अनुदान १० लक्ष ते ५० लक्ष ,वराहपालन निर्मितीकरता अनुदान ५० लक्ष आशा अनेक ठळक बाबींची माहिती या वेळी शेतकऱ्यांना देण्यात आली .हि योजना अंमलात आण्यामागील हेतू असा आहे कि, शेतकरी वर्गासमोर जे दिवसेण दिवस जे आर्थिक संकटे उभा राहत आहेत या संकटांवर शेतकऱ्याला या योजनेतून चांगला हातभार लागेल व शेतकरी आत्महत्येसारखे टोकाची पावले उचलणार नाहीत. त्याकरिता केंद्र शासनाकडून हि योजना राबवली जात आहे .
तसेच अलीकडच्या काळात जनावरात मोठयाप्रमाणत वंध्यत्व या सारखे मोठे प्रश्न का निर्माण होत आहेत या मागील करणे काय आहेत . व या प्रश्नावर उपायजोजना देखील काय करता येईल अशा अनेक घटकांची माहिती या वेळी का कार्यक्रम दरम्यान देण्यात आली . यावेळी गावातील शेतकऱ्याची या अभियानाला मोठी गर्दी दिसून आली .
या योजनेचा लाभ सर्व शेतकरी वर्गाने द्यावा - राधाकृष्ण मेहेत्रे
केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ सर्व शेतकरी वर्गाने द्यावा असे आवाहन राधाकृष्ण मेहेत्रे यांनी केले आहे .या योजनेमुळे शेतकरी वर्गाला चांगला मुनफा प्राप्त करता येईल व नक्कीच या योजनेने गावातील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल

