युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या बीड जिल्हा सहसचिव पदी अशोक पवार यांची निवड       

Beed

 पालवण/ बीडसत्ता प्रतिनिधी 

बीड तालुक्यातील बीड शहराजवळ असलेले पालवण गाव हे राजकीय क्षेत्रात प्रत्येक विषयात चर्चेत असणारे गाव असून गावातील युवक प्रत्यक्ष क्षेत्रात आपलं व आपल्या गावचे नाव लौकिक करत आहेत तसेच पालवण येथील रहिवासी असणारे युवा पत्रकार अशोक पवार आपल्या गावात असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाकडे बारीक लक्ष असते ग्रामीण क्षेत्राची नाळ जोडलेली असल्यामुळे सामाजिक कार्यास नेहमी अग्रेसर असणारे असे त्यांची ओळख आहे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी त्यांच्या सामाजिक तसेच निर्भीड पत्रकाराच्या कार्याची दखल घेऊन त्यांना युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या बीड जिल्हा सहसचिव पदी नियुक्ती पत्र देऊन निवड केली.          गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच पत्रकाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी ही संघटना संपूर्ण राज्यात काम करत आहे अशी कामे आपल्या हातून घडावी असे मा. गणेश कचकलवार म्हणाले त्याचवेळी नियुक्तीपत्र मिळतात त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छा होत आहे त्यावेळी अशोक पवार म्हटले की जी जबाबदारी माझ्यावर राष्ट्रीय अध्यक्षांनी दिली आहे ती चांगल्या प्रकारे पार पाडून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रयत्न करीत राहील