नगरपरिषदेचे कचरा कुंडींचे भूत  बीड शहरातील नागरिकांच्या मुळावर

Beed

अंधारे मॅडम मात्र त्यांच्याच कामाच्या तोर्‍यात
बीड/युवापत्रकार
बीड शहरातील अनेक भागातील कचराकुंड्या या चागलीच दुथर्डी भरून ओसंडत आहेत . या भागात रहदारी करत असलेल्या नागरिकांनी अनेक वेळा नगरपरिषद येथील अधिकार्‍यांना व कर्मचा़र्‍यांना कल्पना देऊनही या प्रश्‍नांवर या ठिकाणच्या अधिकार्‍याकडून व कर्मचार्‍यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे अशी या ठिकाणच्या नागरिकांमध्ये चर्चेची कुजबुज ऐकण्यास येत  आहे.

बीड  शहरामध्ये मागील अनेक महिन्यापासून शहरातील अनेक प्रभागामध्ये ठेवलेल्या कचराकुंड्या अद्यापही स्वछ झालेल्या नाहीत. या कचराकुंड्या आजच्या घडीला अगदी नदी प्रमाणे पूर्णतः भरून दोन्ही बजावून कचरा खाली सांडत आहे . या अशा प्रकारामुळे नागरिकांना धोका निर्माण होत आहेच परंतु याच बरोबर शहरातील मोकाट जनवराना देखील धोका निर्माण होत आहे . या कचराकुंडीत नागरिक  टाकाऊ घटक टाकत असतात हे टाकाऊ घटक खाण्यासाठी शहरातील जनावरे हे टाकाऊ घटक त्या ठिकाणच्या प्लस्टीक पिशवी सोबत खाल्याने जनावरांना देखील मोठे गंभीर आजार उद्भवत आहेत . अशा प्रकारामुळे शहरातील अनेक पाळीव व मोकाट जनावरे देखील मोठ्याप्रमाणावर दगावली जात आहेत .
तसेच भरलेल्या कचराकुंड्यातून परिसरात चांगलेच साथीच्या रोगराईला आमंत्रण दिले जात आहे . ज्या ठिकाणी या कचराकुंड्या भरलेल्या आहेत या परिसरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या आजारांना देखील तोंड द्यावे लागत आहे . यामध्ये डेंगू ,थंडी ताप, चिकनगुनिया ,रिकेटशील अशा अन्य प्रकारच्या आजारांना नागरिकांना तोंड द्यावे लागत असेल तर घनकचरा विभागाला होणार कोट्यावधी खर्च कोणत्या कामचा असा देखील सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
यावरच वरील  ठिकाणच्या कचराकुंड्यातील कचरा लवकरात लवकार स्वच्छ  करून घ्याव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून  केली जात आहे. अशी विनंती करून देखील काही मार्ग न निघाल्यास आम्ही वरील परिसरातील नागरिक घरातील कचरा नागपरिषदेच्या दारात टाकू अशी चेतावणी देखील देताना दिसत आहेत .

कारचराकुंड्या स्वच्छतेचा श्रीगणेशा कधी होणार ...
बीड नगरपरिषद प्रत्येक वर्षाकाठी लाखो  रुपये फक्त घनकचर्‍यांच्या  व्यवस्थापनासाठी खर्च करते तर मग हा प्रश्‍न का वारंवार नागरिकांसमोर डोके वर काडत आहे. होणार्‍या खर्चाची स्वच्छत्यासोबत तुलना करण्याचे ठरवले तर अंदाजे फक्त 30% येवढी खर्चाच्या तुलनेत शहरात स्वछता होत आहे. यामध्ये काही मुख्य परिसरातीलच कचराकुंड्या स्वच्छ ठेवल्या जात आहेत.मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च होणार निधी जातो कोणाच्या घशात हा जनते समोरील मोठा भयंकर प्रश्‍न उपस्थित होत आहे. मग मुख्याधिकारी निता अंधारे या वरील बाकी कचराकुंड्यांचा आपण कधी श्रीगणेशा करणार आहेत असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे .

शहरातील नाट्यगृह देखील यामधून अपवाद नाही ...
शहरातील तसेच खेड्यातील बालकलाकारांच्या कला गुणांना वाव मिळावा व  नाट्यांच्या कलाकारांना  रंगमंच मिळावा या कारणाने सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून हि तोलेजंग इमारत शहरात उभी केलेली आहे. मात्र अलीकडच्या काही दिवसांपासून या इमारतीचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून गेलेला निदर्शनास येत आहे.यामध्ये तुटलेल्या खुर्च्या ,बंद पडलेल्या लाईटस् ,साऊंड व अशा प्रकारची अनेक उपकरणे याठिकाणी बंद अवस्थेत पडलेले आहेत.