दिव्यांग शाळेतील सफाईगार पहारेकरी मदतनीस पदानां पूर्ण वेतन देण्याची जबाबदारी दिव्यांग मंत्रालयाचीच --डॉ जितेंद्र ओव्हाळ

समान काम समान वेतन द्या नसता खुर्च्या खाली करा!
बीड( प्रतिनिधी) समान काम समान वेतन लागू करताना हरामखोरी कोणी केली याचा तपास दिव्यांग मंत्रालय सचिव अभय महाजन यांनी लावून त्याचावर तातडीने गुन्हा दाखल करण्यान्ची मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनावरील मोर्चात केली
. वीस वर्षापूर्वी म्हणजेच 18.8.2004 ला दिव्यांग शाळेत 1)शिपाई 2)काळजीव्हाक 3)स्वयपाकी 4)पहारेकरी 5)सफाईगार 6)मदतनीस या सहा पदानां शासनाने मान्यता दिली यातील शिपाई. काळजीव्हाक. स्वायपाकी. या तीन पदानां पूर्ण वेतन लागू केलं आज ते पूर्ण वेतन घेत आहेत ऊरलेले सफाईगार. पहारे करी. मदतनीस या तीन पदावर अन्याय करून पूर्ण वेतनापासून वंचित ठेवलं वीस वर्षांपूर्वी हरामखोरी कोणी केली असा आमचा आज प्रश्न असून दिव्यांग मंत्रालय सचिव यांनी याचा खुलासा करावा 18.8.2004 नुसार मंजूर सहा पदापैकी तीन पदानां एक न्याय उरलेल्या तीन पदानां दुसरा न्याय खपऊन घेणार नाही तातडीने भूमिका घ्या नसता खुर्चीवर बसू देणार नाही हा इशारा असून या बाबत 14 डिसेंबर ला पुण्यात दिव्यांग आयुक्त गिरी यांना भेटणार असल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली

