बीड नगर परिषदेचा मनमानी कारभार आता थांबणार-शेख निजाम

नागरिकांच्या मूलभूत अत्यावश्यक प्रमाणपत्रांचे निर्गमित
करण्याची कालमर्यादा शासनाने निश्चित केली
बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
लोकांची रोजची सरकारी कामे व राजकीय हस्तक्षेपा मुळे सहा महिने लटकुन ठेवण्यास भाग पडायचे राजकीय फायदा होईल म्हणून सर्वसामान्य नागरिकांना नगरपरिषदेमध्ये प्रत्येक कामासाठी नाहक मोठा वेळ लागत होता त्यामध्ये अनेक मूलभूत अत्यावश्यक प्रमाणपत्र रोजच्या जीवनामध्ये शिक्षणामध्ये व्यापारामध्ये आवश्यक होत्या असे प्रमाणपत्र संबंधित महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत या कार्यालयाकडून प्राप्त करून घेणे आवश्यक होते परंतु नगर परिषदेमध्ये सदरील प्रमाणपत्र निर्गमित करणे बाबत कोणतेही काल मर्यादा निश्चित नव्हती त्यामुळे साधे जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना एक एक महिना चकरा मारून वेळ लागत होता व बांधकाम परवाना व दाखले मिळवण्यासाठी कधी कधी एक एक वर्ष तर कधी कधी दोन दोन वर्षापर्यंत लोकांना सर्व कागदपत्रे देऊन वाट बघावी लागत होती. बीड नगरपरिषदेमधील तर जो लोक शिष्टमंडळ घेऊन येत नाहीत तो पर्यंत नागरिकांच्या पायाभूत सुविधां व समस्या सुटत नव्हतेच अधिकारी व कर्मचारी सत्ताधार्यांच्या इशार्यावर काम करीत होते एखाद्या प्रकरणांमध्ये जाणून-बोलून त्रास देण्याच्या उद्देशाने सदरील प्रमाणपत्र बांधकाम परवाना ना हरकत प्रमाणपत्र बांधकाम पूर्तता प्रमाणपत्र गुंठेवारी यासारख्या अनेक आवश्यक असणार्या नगर परिषदेकडून मिळणार्या सुविधा ह्या नियमानुसार विहित वेळेत दिल्या जात नव्हत्या सदरील प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार सुद्धा झालेले अनेकदा आपल्यासमोर आलेले आहेत या सर्व प्रकरणांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने लोकांना या होणार्या त्रासाबाबत ठोस कार्यवाही व्हावी यासंबंधी प्रयत्न पाठपुरावा सुरू होता त्यानुसार शासनाने या संदर्भात याबाबत आदेश काढलेले असून प्रत्येक नगर परिषदेमधील काम व प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कालमर्यादा निश्चित केलेली असून सदरील काम विहित मुदतीत न केल्यास त्या संबंधी संबंधित कार्यालयातील वरिष्ठाकडे अपील करण्याची मुभा देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणार्या त्रासापासून त्यांची मुक्तता होणार असून आता शिष्टमंडल फारमोला व मि सांगेन त्याचीच कामे होतील ही बाब आता इतिहास जमा होइल अनेक गैरप्रकार यामुळे थांबणार आहे व या उपर ही बीड नगर परिषदेत कालमर्यादेत सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यविषयक , बांधकाम, नगररचना, स्वच्छता विभागाचे कामे न केल्यास शिवसेना पध्दती ने जाब विचारणार व लोकांनी ही काही अडी अडचणी कींवा ञास होत असेल तर शिवसेने च्या कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड शहर प्रमुख शेख निजाम यांनी आपल्या दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

