वही-पेन दान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

महामानव अभिवादन ग्रुपच्या वही-पेन दान अभियानास उत्तम प्रतिसाद, पहिल्या टप्पा संपन्न....

 बीड/प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बीड वाशीयांनी विनम्र अभिवादन केले व महामानव ग्रुप राबवीत असलेल्या वही - पेन दान अभियानास गरजू विद्यार्थ्याना करून दान पारमितीचे पालन केले. यावर्षी देखील या उपक्रमाला 1200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करता येईल एवढे साहित्य प्राप्त झाले.

त्यापैकी भीम नगर जुना मोंढा परिसरातील 30 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतील शालेय साहित्य (वही-पेन) मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सेनी. सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक मधुकरराव जावळे हे लाभले होते. तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक संजय साठे, सेवानिवृत्त जिल्हा प्रबंधक (एल.आय.सी.) उमाजी वाघमारे व प्रशांतजी वासनिक यांची उपस्थिती होती. तर जी.एम.भोले सर व कॅप्टन राजाभाऊ आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
 सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध मूर्तीला पुष्प तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्रिसरण - पंचशील ग्रहण केल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महामानव ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले यांनी करून महामानव अभिवादन ग्रुप मे दिलेले दान व सहा डिसेंबर रोजी मिळालेल्या दानातून शालेय साहित्य कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली.  थोर महापुरुषांची जयंती, स्मृतिदिन म्हणजे त्या महापुरुषांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवून तशी आपल्या जीवनाची वाटचाल ठेवणे हीच त्यांना खरी भावपूर्ण आदरांजली ठरेल, असे प्रमुख पाहुणे प्रा. संजय साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणा द्वारे मिळालेल्या प्रज्ञेला शिलाची, करुणाची, जोड देऊन आपल्या खंडप्राय देशाच्या उत्कर्षाकरीता शेवटपर्यंत झीजले. राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित भारतीय घटना देऊन समस्त भारतीया करीता शांततेचा मार्ग दाखवला. त्या मार्गाने जाणे व सर्वा करता समानतेची, न्यायाची जपणूक करणे हे प्रत्येकाने आपल्या वर्तणुकीतून दाखविणे किती गरजेचे आहे हे प्रशांत वासनिक यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना विद्यार्थ्यांच्या मनावरती बिंबिवले तर उमाजी वाघमारे यांनी दान पारमितेचे महत्त्व किती आहे स्पष्ट केले. आजचे बालक हे पुढील भावी जबाबदार नागरिक बनणार आहेत त्यांना अनेक उदाहरणे देऊन सांगितले की, गरिबी शिक्षणाच्या आड येऊ देऊ नका. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही हे डॉ. बाबासाहेबांचा जीवनपट लक्षात असू द्यावा अशा त्यांच्या शिक्षण काळातील अनेक घटनाक्रम सांगून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी केले. समाजाचे आपण काही देणे लागतो हे लक्षात ठेवून समाज उपयोगी कार्य करणाऱ्यांना दान दात्याकडून भरघोस सतत मदत मिळते असे अध्यक्ष समारोपात मधुकर जावळे यांनी उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ए. बी. जवंजाळ यांनी केले तर सूत्रसंचालन डीएम राऊत यांनी केले. कार्यक्रमास संकल्प साठे, रवींद्र टेकाळे, डी.जी. वानखेडे, बि.डी. तांगडे, काशिनाथ वाघमारे, अंकुश पवळे, भाऊसाहेब पवळे, संघमित्रा वाघमारे, आशा पवळे, आशाताई वाघमारे, कोणता ताई धनवे, सुप्रिया साबळे, प्रणाली साबळे, छाया घोडके व परिसरातील बहुसंख्य विद्यार्थ्यांची व उपासक-उपासिकांची उपस्थिती होती. सरनयतयाने कार्यक्रमाची सांगता झाली.