बीडमध्ये होतेय पान टपरीवर दारू विक्री


मद्यपानाच्या मानसिक तणावातून हजारो कुटुंब रस्त्यावर
बीडसत्ता / युवापत्रकार
अवैध दारू विक्रेत्यांनी बीड जिल्ह्यामध्ये चांगलेच डोके वर काढलेले बघायला मिळत आहेत. कोणताही दारू विक्रीचा परवाना नसताना देखील हे पान टपरी चालक सर्रास पणे चोरून देशी व विदेशी दारू विक्री करत आहेत . यात काही येथील स्थानिक पोलीस प्रशासन बघ्याची भुमिका का घेते असे नागरिकांतून बोलले जात आहे.
बीड जिल्हामध्ये शहरातील काही भागामध्ये पान टपरी चालक अवैध गुटख्या बरोबरच दारू विक्री करत असल्याचे दिसून येत आहे.या विक्रीला पोलीस प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची कारवाई होतांना दिसून येत नसल्याचे सर्वसामान्यांच्या निदर्शनास आलेले नाही. मग या गोडबंगाला मागे नेमका हात कोणाचा हा मोठा प्रश्न जनतेसमोर उभा आहे .बीड शहरातील अनेक वरदळीच्या ठिकाणी दारू विक्री होते.यातून जनतेला त्रास होते अनेक दारूडे महिलाच्या व पुरूषांच्या किंवा टुव्हीर किंवा फोरव्हीलरच्या समोर येतात व दारू पिणाराच अनेक वेळेस समोरच्याला शिव्या देतो सदरील नागरिक दारू पिला म्हणून सोडून देतात पण अनेक ठिकाणी तर पोलिस कर्मचार्यांना सुद्धा दारू पिणारे आरेरावीची भाषा करतात पण याकडे पोलिस प्रशासन डोळे झाक का करते यावर कोणतीही कारवाई का होत नाही असे नागरिकांना प्रश्न पडतो.
पोलिस प्रशासनाने अनेक ठिकाणी दारू विक्रीवर मोठ्या कारवाई केल्यात पण नंतर टपरी चालक काही दिवसांनी सुटून आल्यावर त्याच जागी पुन्हा दारू विक्री करतो पोलिस प्रशासनाच्या अनेक कर्मचार्यांना हे माहित असते पण ते का याकडे डोेळेझाक करतात हे अनेकांना न सूटलेले कोड आहे. बसस्थानक परिसर किंवा अनेक शहरातील शाहु नगर चौक, नगर रोड चौक, पालवन चौक, बार्शी नाका चौक, माळवेस चौक, पेठ बीड परिसर,सावता माळी चौक, जालना रोड, डि.पी.रोड, अनेक ठिकाणी गदारोहळामुळे या ठिकाणहून चालत जात असलेल्या कोचिंग क्लासेसच्या मुलींना व लहान मुलांना येणार्या जाणार्या महिलांना याचा त्रास सहन देखील करावा लागतो. वेळ प्रसंगी सदरील दारू पिणार्या व्यक्तीपासून महिलांना व मुलींना आपला जीव मुठीत घेऊन चालवे लागते.
तरी दारू विक्री करणार्या टपरी चालकांना पोलिस प्रशासन काय कारवाई करेल का? असेच जनतेला दारू पिणार्यांपासून त्रास सहन करावा लागेल असा नागरिकांना प्रश्न आहे.
----------------
पोलिस अधिक्षक कोणावर करणार कारवाई ?
टपरीवर दारू विकणांर्यावर का? दारू पिऊन फिणार्यांवर का? यांना पाठीशी घालणांर्यावर?
बीड जिल्ह्याची पोलीस प्रशासनाची धुरा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर हे मागील अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने सांभाळत आलेले आहेत . या सेवेच्या कारकिर्दीमध्ये पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जनहिताचे अनेक मोठे चांगले आभिमानास्पद निर्णय देखील घेतलेले आहेत. आणि या घेतलेल्या निर्णयाचे जनतेकडून चागलेच तोंडभरून कौतुक देखील झालेले आहे . पण या सर्व अवैध प्रकारच्या कारस्थानात पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी दुर्लक्ष करीत नाहीत हेही शोधावे लागणार आहे. टपरीवर दारू विक्री चोरून करतात हे कोणाच्या जीवावर करतात व दिवसेंदिवस बोकाळत चालेले हा टपरीवर दारू विक्रीचा व दारूड्यांचा त्रास पोलिस अधिक्षक हे आपल्या सहकार्यांना सोबत घेवून थांबवणारका याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
---------------

