संगमेश्वर देवस्थान मासिक शिवरात्र वर्ष पूर्ती सोहळा ...

संत परंपरेची पताखा नवयुवकांच्या खांद्यावर
नाळवंडी / प्रतिनिधी - बीड तालुकयातील नाळवंडी या ठिकाणी स्थित असलेल्या काशीखंड या पावन ग्रंथात उल्लेखनीय असे महादेवाचे जागृत स्थान संगमेश्वर देवस्थान या ठिकाणी दि (११) डिसेंबर या दिवशी मासिक शिवरात्र वर्ष पूर्ती सोहळा संपन्न होणार आहे . मागील अनेक दिवसांपासून या ठिकाणचे नवयुवक हे चालू असलेल्या परंपरेचा वास व वारसा पुढे घेऊन जात आहेत .
काही वर्षा पूर्वी मोडीस आलेली या ठिकाणची परंपरा नवयुवकांनी पुन्हा सुरु केलेली आहे. गावातील इतर सर्व मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येत या परंपरेचा वास आणि वारसा पुढे सुरु केला आहे .नाळवंडी या ठिकाणी स्थित असलेल्या या मंदीराचा उल्लेख काशीखंड या सारख्या पवित्र ग्रंथात आढळत आहे . याच पावनभूमीला योग्य स्थान देण्यासाठी या ठिकाणच्या नवयुवकांन कडून दर माह शिवरात्रीच्या आयेजन केले जात आहे . या आयोजनात या ठिकाणचे संत भूमीतील जेष्ठ नागरिक देखील चांगला हातभार लावत आहेत .
यावरच सुरु केलेल्या संत परंपरेच्या कामाला व या वसा वारसेला गावाकडून व इतर पंचक्रोशीतील मंडळींकडून नवयुवकांना शब्दपरी फुलाच्या हाराने नावाजले जात आहे .हे आयोजन कार्यांचा हेतू असा कळतो आहे कि गावातील नवतरुण पिढी कोणत्याही वाम मार्गाला न जात वारकरी संप्रदायामध्ये पावन व्हवी असे बोलले जात आहे . तसेच या माध्यमातून मंदिराच्या वतीने गावातील लहान मुलांना इंग्रजी व गणित या दोन विषयाच्या मोफत तासिका देखील सुरु केलेल्या आहेत .
हेचि दान देगा देवा
तुझा विसरणं व्हावा
या ओवीला अनुसरून हे देवदेवतांचे कार्य आम्ही सर्व युवक मिळून पुढे घेऊन जात आहेत . तरी या वर्ष पूर्ती सोहळ्याला गावातील व पंचक्रोशीतील भक्तगणांनी या सेवेचा व ह भ प अनिल महाराज यांच्या सुश्राव्य अशा कीर्तनाचा लाभ घ्यावा तसेच कीर्तन समापती नंतर महासंधाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे याचा देखील लाभ भक्तांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणच्या मंदीराचे पुजारी पंचाक्षरी गजबहार यांनी केले आहे .

