बीड मतदार संघातील मतदार यादीत फेरबदल करा-खांडे


बीडसत्ता /प्रतिनिधी
बीड मतदार संघातील म्हळस जवळा या ठिकाणी ग्रामपंचायत अंतर्गत व जवळपासच्या गावातील लोकांचेही मतदार यादीत नावे समाविष्ट आहेत असा प्रकार समोर येत आहे. या घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर खांडे यांनी जिल्हा अधिकारी कार्यलया -कडे तक्रार दाखल केली आहे .
बीड जिल्हातील म्हळस जवळा या ठिकाणी ग्रामपंचायत अंतर्गत व इतर जवळपाच्या गावातील नावे अनेक ठिकाणी समोर आली आहेत . तसेच जे व्यक्ती या ठिकाणचे रहिवासी किंवा त्यांची कोणतंही मालमत्ता या ठिकाणी नसताना देखील म्हळस जवळ या ठिकाणच्या मतदार यादीत नावे लावली जात आहेत असा आरोप खांडे यांनी केला आहे . तसेच अशी गलिच्छ कामे पुढील काळात कोणी करू नये अशी समज देखील संबंधित व्यक्तीस देण्यात यावी अशी देखील मागणी केली गेली आहे.
अर्जात दर्शवला प्रमाणे उपविभागीय अधिकारी , तहसीलदार व निवडणूक अधिकारी यांना या अर्जा मार्फत खांडे यांनी हा गैरप्रकार थांबवावा अशी अर्ज करून मागणी केली आहे .आपण वरील सर्व गैर प्रकारावर लवकरच यांची सखोल चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी अशी अपेक्षा गावकर्यांनी व खांडे यांनी दर्शवली आहे . तसेच यावर काही मार्ग न निघाल्यास सामाजिक कायर्कर्ते ज्ञानेश्वर खांडे व म्हाळस जवळा व जवळपासच्या खेड्यातील गावकरी मिळून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करू अशी चेतावणी दिली आहे .

