दिव्यांग मंत्रालयाचे तुटपुंजे अधिकारी दिव्यांगाच्या नावावर स्वतः चे खिसे भरण्याचे काम करतात -डॉ जितेंद्र ओव्हाळ

Latur

उपसचिव विष्णुदास घोडके च्या चौकशीची करा
-डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचची मागणी

लातूर /बीडसत्ता प्रतिनिधी 

शासन आपल्या दारी निव्वळ दिखावा असल्याचा आरोप डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी लातूर येथे सोमवारी केला.
     दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले तेही सवतीच्या जीवावर याला कोणी सक्षम अधिकारी नाही ना कोणी वाली दिव्यांगाची नुसती फरफट चालू आहे राज्यातील दिव्यांग शाळांच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेतात का असा प्रश्न उपस्थित करत शेकडो शाळा ह्या अधिकारी च चालवत असल्याचा घणाघात डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केला टक्केवारी देऊन घेऊन कामं करण्याची परंपरा आता मोडा सचिव अभय महाजन  साहेब टक्केवारी घेणाऱ्याचा माज उतरवा मंत्रालयात ठाण मांडून बसलेले उपसचिव विष्णुदास घोडके यांच्या कामाची खातेनिहाय चौकशी करा,  दिव्यांग आयुक्त कार्यालय ताळ्यावर आणा नसता खुर्च्या खाली करा अशी मागणी करत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी लातूर येथून दिला असून पुढील आठवड्यात मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन या बाबद आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे सांगितले.