पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी मोहन महाराज शिंदे यांची निवड    

Maharashtra

      पुणे / प्रतिनिधी

पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी आळंदी येथील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांची निवड करण्यात आली आहे ग्रंथालय संघाचे कार्यवाह सोपानराव पवार यांनी ही घोषणा केली आहे ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन आळंदीत घेण्यात येणार आहे असल्याचं सर्वमताने ठराव मंजुरी देण्यात आली  असल्याची माहिती अध्यक्ष ने दिली आहे.

याप्रसंगी व्यासपीठावर  ग्रंथालय संघाचे मावळते अध्यक्ष विजय कोलते,काका चव्हाण, मीठापल्ली, राजू घाटोळे, चंद्रशेखर कपोते, राजेंद्र ढमाले, विलास चोंदे, रमेश सुतार, राहुल चव्हाण, एम.डी पाखरे, कोल्हापूर,सातारा,सांगली,सोलापूर येथील जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी उपस्थित होते ग्रंथालय संघाचे मावळते अध्यक्ष विजयराव कोलते यांनी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे नवनिर्माचित अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांचा शाल.श्रीफळ देऊन अध्यक्षांचा स्वागत केले ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्षपदी हनुमंत देवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे श्री आळंदी धाम सेवा समितीचे राहुल चव्हाण यांच्या हस्ते ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी महादेव पाखरे,गोविंद ठाकूर, उपस्थित होते, रमेश सुतार यांनी आभार मानले