बीड जिल्हा रुग्णालयातील उपचाराला रुग्णांनी दाखवली पाट ...



शासन आपल्या दारी पण जिल्हाभरातील रुग्ण खागजी दवाखान्याच्या दारी ...
बीडसत्ता /प्रतिनिधी - बीड जिल्हा भरतील रुग्णाकडून बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अलीकडील काळात चांगलीच पाठफिरवलेली दिसून येत आहे .
या मागे अनेक कारणे समोर येत आहेत यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणच्या रक्त पेंडीमध्ये रक्त पुरवठा तुटवडा असेल किंवा औषध भंडार मधील औषधांचा तुटवडा असेल हे या मागची प्रमुख कारणे चर्चिली जात आहेत .यावर आता सुरु असलेल्या सोनोग्राफी सेंटर या ठिकाणी देखील रुग्णाची चांगल्या प्रकारे सेवा होत आहे मात्र या ठिकाणी देखील यंत्रणेच्या देखील काही त्रुटी भासत आहेत . अशी रुग्णांमध्ये कुजबुज ऐकण्यास येत येत . या अशा अनेक छोट्या मोठ्या कारणामुळे जिल्हाभरातील रुग्ण या ठिकाणच्या अनेक सेवाणा तिरकी वाट करत खाजगी रुग्णालयाकडे आपला कल डावलत आहेत . तरी या ठिकाणचे जिल्हाशल्य चिकित्सक बडे यांनी हि परिस्थिती अशा पद्धतीने नियंत्रणात आंतील हे बागने महत्वाचे ठरणार आहे .
डॉ.बडे साहेब जिल्हा रूग्णालयातील प्रस्तुती गृहाचे कार्य कौतुकास्पद
जिल्हा रूग्णालयामध्ये प्रस्तुती गृह येथील कर्मचारी येणार्या रूग्णाची व्यवस्थीत काळजी घेतात व येथे स्वच्छता व्यवस्थापन देखील उत्कृष्ट पद्धतीने केलेले आहे.या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर शक्यतो सिजर या व्यवस्थेपर्यंत महिला रूग्णाला जाऊ देत नाहीत. तसेच या विभागातील स्वच्छता महिला कर्मचारी या ठिकाणच्या महिला रूग्णांच्या नातेवाईकांना कसल्याही प्रकाराची हेळसांड करत नाहीत.याच विभागाप्रमाणे इतर विभागात स्वच्छता आणि व्यवस्थापक दर्जेदार व्हावे अशी रूग्णांकडून व नातेवाईकांकडून मागणी होत आहे.
डॉ. सचिन देशमुख ओपीडीला फिरकत नाहीत
डॉ.सचिन देशमुख हे मंगळवारी सकाळी 11.15पर्यंत ओपीडीला फिरकत नाहीत. रूग्णांनी डॉक्टर यांना फोन लावला असता देशमुख यांनी बीएएमएस डॉक्टर याना संपर्क साधला जर या ठिकाणी त्या विभागाचे डॉक्टर तपासणी करत नसतील व इतर डॉक्टर तपासणी करत असतील तर उद्या अनावधानाने एकादी दुर्देवी घटना घडल्यास यास जबाबदार कोण ?

