पन्नास टक्क्यांचं अनुदान शंभरटक्के करताना दिव्यांग मंत्रालयाचं रंडक धोरण -- डॉ जितेंद्र ओव्हाळ

123 च्या 123 शंभरटक्के अनुदानित करा
बीडसत्ता / प्रतिनिधी
दिव्यांगाच्या 123 शाळांपैकी पन्नास टक्के अनुदान मंजूर करण्यात आलेल्या 60 शाळांना शंभरटक्के अनुदान मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवून दिव्यांग मंत्रालयाने रंडक धोरण राबवलं असल्याचा आरोप डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी सोमवारी केला .
दिव्यांग मंत्रालय सचिव अभय महाजन कोणत्या कायद्याचा अभ्यास करतात असा सवाल उपस्थित करत 123 पैकी 60 च दिव्यांग शाळेना शंभर टक्के अनुदानित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवतात हा खेडसाळपणा आहे उरलेल्या 63 दिव्यांग शाळेनी काय केलं यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केला सचिव अभय महाजन यांनी हा निर्णय तातडीने बदलण्याची मागणी डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केली असून 123 दिव्यांग शाळेना शंभरटक्के अनुदान देण्याची शासनाकडे शिफारस करावी नसता थेट सचिव अभय महाजन यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला असून लवकरच या बाबतीत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांच्या बैठकीत डॉ.जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली

